उभ्या पिकांवर किटकांसह किडींचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:32+5:30

यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २१,२,९९४.९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सध्या निंदन, खत देणे आदी कामे युद्धपातळीवर केली जात आहेत.

Insect infestation with vertical crops | उभ्या पिकांवर किटकांसह किडींचा प्रादुर्भाव

उभ्या पिकांवर किटकांसह किडींचा प्रादुर्भाव

Next
ठळक मुद्देढगाळी वातावरणाचा फटका : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, कृषी विभाग सुस्तच

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम आहे. अशातच उभ्या पिकांवर सध्या किटकांसह किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागानेही हवालदिल शेतकऱ्यांना वेळीच मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
यंदाच्या वर्षी वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. त्यामुळे सध्या सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची बऱ्यापैकी वाढही झाली आहे. मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण असल्याने सध्या तापमानही कमी आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात २१,२,९९४.९ हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून सध्या निंदन, खत देणे आदी कामे युद्धपातळीवर केली जात आहेत. काही ठिकाणी कपाशी पात्या व फुल येण्याच्या अवस्थेत असली तरी आर्वी तालुक्यात काही ठिकाणी या पिकावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहेत. तर जिल्ह्यातील आठही तालुक्यात कमी अधिक प्रमाणात कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाची वाढ बऱ्यापैकी झाल्यावर किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

अशा कराव्या उपाययोजना
ज्या भागात कपाशी पिकांवर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत त्या भागातील शेतकºयांनी अ‍ॅसीफेट ७५ एस.पी. किंवा क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० मि.ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून पिकांवर फवारणी करावी. तसेच सायोबीन पिकांवर चक्रीभूंगा आणि खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास ट्रायझोफॉस २० मि.ली. प्रती १० लि. पाण्यात मिसळून त्याची फवारणी शेतकऱ्यांनी फवारणी करावी, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

५६,२२२.२ हेक्टरवर तुरीची लागवड
जिल्ह्यात यंदा ५६,२२२.२ हेक्टरवर शेतकऱ्यांनी तुरीची लागवड केली आहे. योग्य निगा राखल्या गेल्याने या पिकांची वाढ सध्या समाधानकारक झाली आहे. निंदन, खत देण्याचे काम सध्या शेतकऱ्यांकडून पूर्णत्त्वास नेले जात आहे.

सोयाबीनवर चक्रीभंूगा, खोडमाशीचा प्रादुर्भाव
१३,८,८८१.०५ हेक्टरवर यंदा सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत असून पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. असे असले तरी आर्वी तालुक्यातील काही भागासह जिल्ह्यातील इतर काही ठिकाणी सोयाबीन पिकांवर चक्रीभूंगा व खोडमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Web Title: Insect infestation with vertical crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती