शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा जिल्ह्यात दूध, फळ आणि भाजीपाल्याच्या आयात-निर्यातीवर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 19:26 IST

सध्या स्थितीत सेफ झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन इतर जिल्ह्यातून येणारा भाजीपाला, दुध, फळ तसेच मांस तसेच सदर जीवनावश्यक साहित्य वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पाठविण्यावर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी घेतला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा आदेशकोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर तसेच अमरावती या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढले आहेत. परंतु, सध्या स्थितीत वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. म्हणजेच सेफ झोन असलेल्या वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेऊन सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणारा भाजीपाला, दुध, फळ तसेच मांस तसेच सदर जीवनावश्यक साहित्य वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात पाठविण्यावर १४ एप्रिलपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी घेतला आहे.भाजीपाला विक्रीच्या केंद्रांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून यापूर्वीच भाजी बाजार इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. शिवाय तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. भाजीपाला विक्रेता हे अनेक नागरिकांच्या संपर्कात येत असल्याने त्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. त्यानंतर ६ व ७ एप्रिलला भाजीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर आता ८ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात भाजी, दुध, मांस व फळ आणण्यास तसेच वर्धा जिल्ह्याबाहेर सदर जीवनावश्यक वस्तू पाठविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी या सात दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भाजीबाजार, फळ व मांस विक्रीचे दुकान दिलेल्या वेळेत सुरू राहणार आहे. इतकेच नव्हे तर नागरिकांनाची कुठल्याही परिस्थित गैरसोय होणार नाही याची दक्षताही जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात भाजीपाल्याचे उत्पादन मुबलकवर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यात ज्या शेतकºयाकडे सिंचनाची सोय आहे असे शेतकरी भाजीपाल्याचे पीक घेत आहेत. सध्या अनेक शेतकरी विविध भाजीपाला वर्गीय पिकांची नियमित तोड करून तो नाशवंत शेतमाल बाजारपेठेपर्यंत आणत आहेत. तर काहींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. जिल्ह्यात सध्या टमाटर, चवळी, वांगे, मिरची, वाल, काकडी, भेंडी, ढेमस, पालक, संभार, कांदा, शेवगा, पत्ताकोबी व फुलकोबीचे उत्पादन होत असून हा शेतमाल शेतकºयांच्या शेताच्या धुºयावरून थेट बाजारपेठेपर्यंत कसा येईल यासाठीही विशेष प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले.नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ व अमरावती या वर्धा जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. मात्र, वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोनाला अटकाव घालण्याच्या उद्देशाने पुढील सात दिवस वर्धा जिल्ह्यात भाजीपाला, दुध, मांंस व फळ इतर जिल्ह्यातून आणण्यास तसेच सदर जीवनावश्यक वस्तू वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात निर्यात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा निर्णय थोडा कठोर असला तरी नागरिकांची गैरसोय होणार नाही याचीही दक्षता घेतली जाणार आहे.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस