शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह वर्ध्याच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, तलाठी खवास व कनिष्ठ लिपीक बडे यांचे पथक सकाळी गस्तीवर असताना कन्हानची वाळू भरलेले ट्रक वर्ध्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवली. दरम्यान चौदा चाकांचा ट्रेलर एम. एच. ३२ ए.जे.५६९२ हा वर्ध्यातील गांधी चौकातून सेवाग्रामकडे जाताना दिसला.

ठळक मुद्देदोन ट्रक पळाले । सेवाग्राम पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात मोठ्याप्रमाणात अवैधरित्या कन्हानच्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांसह सेलू व वर्धा येथील तहसीलदारांनी पाठलाग करुन सेवाग्राम परिसरात वाळू भरलेला एक मोठा ट्रक जप्त केला. तर दोन ट्रक पळून जाण्यात यशस्वी झाले. जप्त केलेल्या ट्रकचालकाविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह वर्ध्याच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, तलाठी खवास व कनिष्ठ लिपीक बडे यांचे पथक सकाळी गस्तीवर असताना कन्हानची वाळू भरलेले ट्रक वर्ध्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवली. दरम्यान चौदा चाकांचा ट्रेलर एम. एच. ३२ ए.जे.५६९२ हा वर्ध्यातील गांधी चौकातून सेवाग्रामकडे जाताना दिसला. पथकाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो भरधाव पुढे निघून गेला. त्यामुळे या ट्रकचा पाठलाग करुन सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या समोर तो पकडला. चालकाला रॉयल्टी विचारली असता त्याच्याकडे रॉयल्टी नसल्याने तहसीलदार डुडुलकर यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन ट्रक चालक व्यंकट विनोद नागरिकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून पुढील कारवाई सुरु होती. हा ट्रक कैलास धारवाल, रा. वर्धा यांच्या मालकीचा असल्याचे चालकाने सांगितले आहे. त्यामुळे आता ट्रक मालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. पुढील ट्रक पकडताच मागाहून येणाºया वाळू भरलेल्या दोन ट्रकने सेलूच्या दिशेने यशस्वी पळ काढला.कन्हानच्या रेती वाहतुकीवर ‘वॉच’महसूल विभागाच्या पथकाने आता कन्हानच्या वाळूवर लक्ष वळविले आहे. एक टॉलर जप्त केले असता त्यामध्ये १४.४३ ब्रास कन्हानची वाळू आढळून आली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या टॉलरला पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे. आता वाळू आणि वाहन मिळून याचा दंड जवळपास साडेतेरा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.शहरातून कन्हानच्या वाळूची मोठ्याप्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच्या कारवाईत चालकाकडे रॉयल्टी नसल्याने त्याच्याविरुद्ध सेवाग्राम पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार आहे.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.

टॅग्स :sandवाळू