वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर मारण्याची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 05:00 AM2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:37+5:30

वन्यप्राण्यांमध्ये रानडुकर व रोही यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते. एवढेच नव्हेतर रानडुकर, वाघ, बिबट थेट संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेकांचे जीव गेले आहे. याबाबत शेतकरी वनविभागाकडे तक्रार करतात, पण, वनविभाग कायद्याची चौकट सांगून नुकसान भरपाई देण्यासही टाळाटाळ करतात.

If the wildlife is not settled, allow it to kill | वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर मारण्याची परवानगी द्या

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त होत नसेल तर मारण्याची परवानगी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकऱ्यांच्या संयमाचा भडका : वनविभागाची जाणीवपूर्वक डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : जंगलव्याप्त परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची वन्यप्राण्यांकडून नासधूस केली जात आहे. आता या प्राण्याचा वावर थेट सेलू, घोराडपर्यंत आला आहे. शेतकºयांच्या तोंडचा घास एका रात्रीतून हिसकावल्या जात असला तरी वनविभाग हातावर हात ठेवून कायद्याची भाषा बोलतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटला असून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा मारण्याची परवानगी द्या, अशी मागणी करीत आहे.
वन्यप्राण्यांमध्ये रानडुकर व रोही यांचे कळप शेतात घुसून पिकांची नासाडी करतात. वनविभागाकडून नुकसान भरपाईच्या नावावर थट्टा केली जाते. एवढेच नव्हेतर रानडुकर, वाघ, बिबट थेट संधी साधून शेतकऱ्यांवर हल्ला करतात. यात अनेकांचे जीव गेले आहे. याबाबत शेतकरी वनविभागाकडे तक्रार करतात, पण, वनविभाग कायद्याची चौकट सांगून नुकसान भरपाई देण्यासही टाळाटाळ करतात. शंभर टक्के अनुदानावर शेतकºयांच्या शेताला तारांच्या जाळीचे कुंपन देण्याची शेतकऱ्यांची मागणी धुडकावून लावल्या जाते. वन्यप्राण्यांच्या दहशतीमुळे रात्रीची जागल बंद झाली. मजुर शेतात कामावर येतांना वन्यप्राण्यांची भिती व्यक्त करतात. मात्र; पोटाची खळगी भरण्यासाठी मृत्यू समोर असताना त्यांना काम करण्याशिवाय पर्याय नाही. शेतातीलच काय गोठ्यातील जनावरेही वन्यप्राणी उचलून नेतात. शेतकºयांचा केव्हा जीव जाईल याचा नेम नाही. जनावरांबरोबर मानसांवरीलही हल्ले वाढले आहे. शासनाने शेतकºयांना दिवसभर वीज मिळेल, अशी व्यवस्था करावी. म्हणजे रात्री जीव धोक्यात घालून ओलीत करण्याची वेळ येणार नाही. शेती करण्यासाठी पूर्ण संरक्षण द्यावे अन्यथा शेतकरी स्वत:च वन्यप्राण्याचा बंदोबस्त करेल. त्यासाठी वन्यप्राण्यांना मारण्याची परवानगी द्यावी अशी संतप्त प्रतिक्रिया आता शेतकऱ्यांकडून व्यक्त होऊ लागल्या आहे.

Web Title: If the wildlife is not settled, allow it to kill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल