शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी मोडला तर आयुष्यात दुरुस्त होणार नाही

By admin | Updated: October 5, 2016 01:52 IST

इमारत मोडली तर पुन्हा बांधता येईल, स्वच्छतागृह मोडले तर पुन्हा बांधता येईल; पण विद्यार्थी मोडला तर पुन्हा आयुष्यात कधीही बांधता येणार नाही.

शैलेश नवाल : तळेगाव (टा.) जि.प. प्राथमिक शाळेची केली पाहणी, परिसरात वृक्षारोपणतळेगाव (टा.) : इमारत मोडली तर पुन्हा बांधता येईल, स्वच्छतागृह मोडले तर पुन्हा बांधता येईल; पण विद्यार्थी मोडला तर पुन्हा आयुष्यात कधीही बांधता येणार नाही. यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केले. जि.प. प्राथमिक शाळा तळेगाव (टा.) येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य मिलिंद भेंडे, पं.स. सदस्य विमल वरभे, सरपंच अतुल तिमांडे, केंद्र प्रमुख वसंत खोडे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी नवाल पूढे म्हणाले की, शिक्षकांची जेवढी जबाबदारी आहे, तेवढीच पालकांची आहे. शिक्षकांनी आपली जबाबदारी पार पाडावी. अभियंता चुकला तर एक पूल खचेल, डॉक्टर चुकला तर एक पेंशट मरेल; पण एक शिक्षक चुकला तर पूर्ण पिढी गारद होईल. यामुळे शिक्षकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सोबतच विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता पाळावी. गावात घरोघरी शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा, असेही जिल्हाधिकारी नवाल यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या वर्गांची पाहणी करीत मुलांशी संवाद साधला. ज्ञानरचनावादावरील साहित्याचा विद्यार्थी कसा उपयोग करून घेतात, याबाबत जाणून घेतले. हसत-खेळत विद्यार्थ्यांशी हितगुज केले. विद्यार्थ्यांनीही उत्तरे दिली. खोडे यांनी शाळेच्या प्रगतिबाबत माहिती दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. भेंडे यांनी प्रास्ताविकातून शाळेचे उपक्रम, पालकांचा सहभाग याबाबत माहिती दिली. संचालन करीत आभार खोडे यांनी मानले. कार्यक्रमाला शाळा व्य.स.चे सदस्य सुधीर कोल्हे, मनोहर राऊत, विनोद गोडे, अनिल शंभरकर, सुरज गणवीर, प्रफुल्ल गर्गे, सुधीर सगणे, मनोज मस्के, विजय झाडे, सुनील कोल्हे, योगिराज पाटील, राजेंद्र भोयर, चंद्रशेखर वैद्य, भगत आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)