शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारी आदर्श शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

या शाळेमध्ये वर्गखोलीसोबतच परिसर सजावटीवर भर देण्यात आला. भित्तीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण-उत्सव, दिनविशेष यापासून तर भाषा व गणिताचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिकता यावे हाच या मागचा उद्देश असून यात भर घातली ती परसबागेने. शाळेच्या सुशोभिकरणासह विद्यार्थ्यांना आधुनिकतेची जाण करुन देण्यासाठी ई-लर्निंग सुरु केले.

ठळक मुद्देनावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर : खासगी शाळांनाही लाजवेल असा परिसर व दर्जेदार शैक्षणिक वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : शाळा संस्काराचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांची जडणघडण होते, ती शाळेतच; पण कालौघात शिक्षण प्रक्रिया बदलली. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि कृतिशील शिक्षणावर भर देण्याकडे कल वाढला. यातही काही शाळांकडून शैक्षणिकदृष्ट्या विशेष कार्य केले जात आहे. यात सेवाग्राम येथील हावरे ले-आऊटमधील शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश ठेवून कार्य करणारी एक आदर्श शाळा ठरली आहे.या शाळेमध्ये वर्गखोलीसोबतच परिसर सजावटीवर भर देण्यात आला. भित्तीपत्रकावर घोषवाक्ये, अभ्यासक्रमातील महत्त्वाचे मुद्दे, सण-उत्सव, दिनविशेष यापासून तर भाषा व गणिताचाही समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना खेळता-खेळता शिकता यावे हाच या मागचा उद्देश असून यात भर घातली ती परसबागेने. शाळेच्या सुशोभिकरणासह विद्यार्थ्यांना आधुनिकतेची जाण करुन देण्यासाठी ई-लर्निंग सुरु केले. संगणक व लॅपटॉपच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली. येथील विद्यार्थी शिक्षणासह भाषण, गीत,आणि नृत्यामध्येही कुठे कमी नाही. या शाळेत हिंदी भाषिक विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. या शाळेत येणाऱ्या प्रत्येकाचे विद्यार्थी प्रवेशद्वारावर हसून स्वागत करतात. आदर्श शाळेतील हे परिवर्तन पाहण्यासाठी आतापर्यंत शासकीय अधिकारी, शिक्षण संस्थांचे संचालक तसेच महाराष्ट्रातील विविध शाळांतील शिक्षक अशा जवळपास पाच हजार व्यक्तींनी या शाळेला भेट देऊन गौरव केला आहे.‘प्रकाश’मय झाले जीवनहावरे ले-आऊटमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत २०१० मध्ये बालवाडी सुरु करण्यात आली. त्यानंतर पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू झाल्यावर २०११ पासून या शाळेत प्रकाश कांबळे नामक शिक्षक रुजू झाले. त्यांनी या शाळेतील चेहरामोहरा बदविण्यासाठी पदरमोड केली. परिणामी, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनासह परिसरातील वातावरणही ‘प्रकाश’मय झाले आहे. आज ही शाळा जिल्ह्यात एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जात आहे.विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता घर व शाळेतील वातावरण महत्त्वाचे आहे. ते या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे. सहकार्य व विश्वास महत्त्वाचा असून तो शाळेत देत आहे.-प्रयोग तेलंग, मुख्याध्यापकशाळा खूप चांगली असून शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ताही सुधारत असल्याने मी माझ्या मुलाला याच शाळेत प्रवेश दिला.-प्रा.महादेव चुुंचे, पालकपालक, नागरिकांकडून शाळेला मदतीचा हातविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणाऱ्या या शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये तसेच भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालक, नागरिक मदतीचा हात देतात.

टॅग्स :Schoolशाळा