शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूविरूद्धच्या युद्धात शेकडो विद्यार्थी मैदानात

By admin | Updated: September 11, 2014 23:45 IST

शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे़ याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागरण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पुलगाव : शहरात डेंग्यूसदृश्य आजाराने थैमान घातले आहे़ याला आळा घालण्यासाठी नगर परिषद, आरोग्य विभाग व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने व्यापक जनजागरण स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी, नगर परिषद कर्मचारी, शिक्षक, नगरसेवक व शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.गत काही दिवसांपासून शहरात संततधार पावसामुळे व परिषदेच्या गलथान कारभारामुळे स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, शहरातील अनेक भागात डेंग्यूने थैमान घातले. यात तीन बालकांचा नाहक बळी गेल्याने शासनाची झोप उडाली़ अनेक डेंग्यू सदृश्य रुग्ण उपचार घेत आहेत. अशातच उशीरा का होईना, न.प. वैद्यकीय व शहरातील शैक्षणिक शाळांनी सहभाग घेतला. यात ललिताबाई मुरारका हायस्कूल, ज्ञानभारती विद्यालय, आर.के. हायस्कूल, आदर्श हायस्कूल, डॉ. चंद्रशेखर आझाद उर्दू हायस्कूल, नगर परिषद हायस्कूल, इंडियन मिलिटरी स्कूल, औद्योगिक प्रशिक्षक संस्था यासह अनेक शाळांनी या मोहिमेत सहभाग घेतला. घरोघरी जाऊन सांडपाणी, केरकचरा व डेंग्यू सदृश्य परिस्थितीत आढळल्यास सावधगिरीचे मार्गदर्शन करण्यात आले़ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारळवार यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी टेमिफॉस नावाचे द्रावण टाकून डेंग्यू सदृश्य जंतूचा नाश केला. त्याचप्रमाणे चुडी मोहल्ला येथे लॉयन्स क्लबच्यावतीने नाल्यांमध्ये विषारी औषधाची फवारणी करण्यात आली़ नगरसेवक अरुण रामटेके यांनी ५००० पत्रके छापून शहरात वाटून योगदान दिले. या मोहिमेत नगराध्यक्ष मनीष साहू, मुख्याधिकारी राजेश भगत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार, राजन चौधरी, प्रा. रविकिरण भोजने, विठ्ठल वानखेडे, प्रा. डोंगरे, शंभरकर, लाखे, हटवार, रायपूरे, गायगोले, येंडे, सूर्यवंशी, पाकमोडे, जमील, लॉयन्स क्लबचे डॅनियल, कैलाश शर्मा, अझहर अहमद खान, अलझद मोहोनुद्दीन, शिदोडकर, मुन्ना पंड्या, डॉ. चव्हाण, नगरसेवक, २५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत मोहीम राबविली.(शहर प्रतिनिधी)