शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन कामगार स्वगावी जाण्यास आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 05:00 IST

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ओलांडत हिंगणघाटवरून राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या ट्रकला अडवून ५८ कामगारांना ताब्यात घेतले होते.

ठळक मुद्देजीबीएमएम, कमला नेहरू शाळेत क्वारंटाईन : विविध स्वयंसेवी संस्थांकडून जेवणाची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावरून नागपूरमार्गे अन्य राज्यात जाणाऱ्या व शहरात फिरणाºया निराधार ९० लोकांना पोलिसांनी ताब्यात घेत शहरातील तीन ठिकाणी त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, यापैकी अनेकांनी जेवणाला नकार देत स्वगावी पोहोचविण्याचा आग्रह धरल्याची माहिती आहे.देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांना कलम १४४ नुसारघराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सारा देश लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्याअनुषंगाने राज्य व जिल्ह्यात सीमाबंदी करण्यात आली आहे. मात्र, राज्य व अनेक जिल्ह्याच्या बंद सीमा ओलांडत हिंगणघाटवरून राष्ट्रीय महामार्गाने जाणाऱ्या ट्रकला अडवून ५८ कामगारांना ताब्यात घेतले होते. हे कामगार चेन्नई व हैदराबादकडून नागपूरमार्गे ग्वालियर व राजस्थानकडे ट्रक व कंटेनर अशा तीन वाहनांतून जात होते.या कामगारांना जीबीएमएम हायस्कूल व कमला नेहरू शाळेमध्ये तर शहरात फिरणाºया ३१ निराधारांना वसंत लॉन येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे.त्यांची आरोग्य तपासणी करून भोजनाची व्यवस्था नारायण सेवा मंडळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, निरंकारी सेवा मंडळ, रोटरी क्लब अशा अनेक सेवाभावी संस्थांनी केली आहे. या क्वारंटाइनमध्ये मध्ये स्त्री-पुरूष व लहान मुलांचासुद्धा समावेश आहे. यापैकी काहींनी जेवण नाकारत मुलाबाळांच्या विरहापोटी आपापल्या गावी जाण्यासाठी आग्रह धरून असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस