शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कटंन्मेंट झोनमधील नागरिकांना घरपोच सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

सिंधी कॅम्प परिसरात आई आणि बाळ कोरोना बाधित असल्याने हा सर्व परिसर सील करण्यात आला आहे. लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूची अडचण निर्माण झाली. उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी जवळपास ७० सामाजिक कार्यकर्ते नेमून त्यांच्याकडून सुविधा पुरविण्याचे नियोजन केले.

ठळक मुद्दे१६० घरांना भाजीपाला, ४४ घरांना सिलिंडर : ३२ नागरिकांची आरोग्य केंद्रात तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : येथील सिधी कॅम्प परिसर कंटेन्मेंट झोन असल्याने जवळपास दोनशे घरे क्वारंटाईन आहेत. माणुसकीच्या नात्याने त्यांच्या सेवा सुविधांचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते सुनील आणि गोवर्धन कटियारी यांनी सर्व घरांना पुरेल असे सर्व भाजीपाल्याचे साहित्य नेमलेल्या समाजसेवकाकडून घरपोच वितरित केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.सिंधी कॅम्प परिसरात आई आणि बाळ कोरोना बाधित असल्याने हा सर्व परिसर सील करण्यात आला आहे. लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परिणामी, जीवनावश्यक वस्तूची अडचण निर्माण झाली. उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी जवळपास ७० सामाजिक कार्यकर्ते नेमून त्यांच्याकडून सुविधा पुरविण्याचे नियोजन केले.या कंटेन्मेंट झोनमधील कुटुंबांकडील सिलिंडर संपले. त्यामुळे स्वयंपाकाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबतची माहिती अ‍ॅड. दीपक मोटवानी यांनी प्रशासनाला दिली. लगेच रिकामे सिलेंडर गुरुनानक धर्मशाळेत जमा करण्यात आले आणि गरजू व्यक्तींना भरलेले सिलेंडर प्रशासनाने वितरित केल्याने मोठी अडचण दूर झाली.या धर्मशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्र रविवारीच तयार करण्यात आल्यामुळे परिसरातील लोकांची आरोग्याची मोठी अडचण दूर होऊन सुविधा उपलब्ध झाली.सोमवारी जवळपास ३२ रुग्णांनी तपासणी केली आणि औषधीचे वितरण त्यांना करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. विशाल चव्हाण, आरोग्यसेविका मंदा राठोड, आरोग्यसेवक सुनील राठोड यांची ड्युटी लावण्यात आली आहेपरिसर सील केला असल्याने यातील लोकांना जाणे-येणे करणे करता येत नाही. त्यामुळे काही लोकांची पैशाचीही अडचण निर्माण झाली. कंटेन्मेंट झोन असल्याने बाहेर जाण्यास मज्जाव आहे. त्यामुळे काही दिवस त्यांना अडचण सहन करावी लागेल, असे तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या