शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

अवैध उत्खननामुळे टेकड्या, गढी होताहेत इतिहासजमा

By admin | Updated: June 4, 2014 23:57 IST

शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे) भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात मातीच्या गढय़ा नजरेस पडतात.

वर्धा : शहरालगतचा बराचसा भूभाग हा उंचसखल टेकड्यांनी व्यापला आहे. पिपरी (मेघे), उमरी (मेघे)  भागाला या टेकड्यांचा वेढा आहे. ग्रामीण भागातही तुरळक प्रमाणात मातीच्या गढय़ा नजरेस पडतात. पण या टेकड्या आणि गढय़ा जेसीबीच्या सहाय्याने पोखरण्यात येत आहे. या सततच्या माती व मुरुमाच्या उत्खननामुळे येत्या काही वर्षात या टेकड्या इतिहासजमा होतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नैसर्गिक संसाधनावर मानवी वस्तीचे होत असलेले अतिक्रमन वाढतच आहे. कुठलाही परिसर हा सर्वत्र सपाट नसतो. कुठे तो उंचसखल तर कुठे मैदानी भाग असतो. यामुळे भूभागाचे संतुलन कायम रहाते. या उंच भागालाच आपण टेकड्या, जास्त उंच भागाला पर्वत तर केवळ मातीच्या उंच भागाला गढी असे संबोधले जाते. नैसर्गिकदृष्ट्या त्याची निर्मिती झाल्याने त्यामुळे निसर्गाचे संतुलन राखले जाते; परंतु मानवाचा शिरकाव जंगलांपर्यंत झाल्याने मानवी वस्तीबाहेर असलेल्या या टेकडी आणि गढी शहरात, गावांत दाखल झाली. त्यांच्याभोवताल वस्त्यांची संख्या वाढू लागली. घरांच्या बांधकामाकरिता या टेकड्यांना पोखरुन मुरूम आणि गढींमधील माती उपयोगात आणल्या जाऊ लागली. याचे प्रमाण वाढल्याने यावर निर्बंध लादण्यात आले. तसेच यामुळे संबंधित प्रशासनाला महसूलही मिळाला. हे उत्खनन मात्र या टेकड्यांच्या मुळावर उठले असून त्यामुळेही या टेकड्यांचे अतोनात दोहन होत आहे. परीणामी पर्यावरणाचेही नुकसान होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा टेकड्या आढळतात. त्यातील अनेक टेकड्यांवर सध्या अशाच प्रकारे अवैध उत्खनन होत असल्याचे दिसते. टेकड्यांपासून मिळत असलेल्या मुरुमाचा उपयोग घराच्या बांधकामात जोत्यात भराईसाठी केला जातो. याप्रकारच्या अवैध उत्खननातून मोठ्या प्रमाणात मुरुम मिळत असल्याने दिवसेंदिवस शहराबाहेरील टेकड्या पोखरण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. परंतु संबंधित प्रशासनाला याची माहिती नसल्यागत कारवाई शून्य असून टेकड्या पोखरल्या जात आहेत. (शहर प्रतिनिधी)निसर्गाचेही दोहनटेकड्या व गढय़ांच्या निर्मितीची  प्रक्रिया ही नैसर्गिकरित्या होत असते. त्यामुळे निसर्गाचे संतुलन कायम राहते. गावांतील गढय़ादेखील नद्यांच्या आसपास आढळतात. त्यामुळे गावात नदीच्या पुराचे पाणी शिरत नाहीदिवसेंदिवस या गढय़ांचे दोहन होत असल्याने पूराला अटकाव करणारी ही नैसर्गिक यंत्रणाच नेस्तनाबूत झाली आहे. याचा परिणामही काही काळात ग्रामीण भागातील नागरिक सोसत आहे.टेकड्यांमुळे भूजल पातळी कायम राहते. अवैध उत्खननाने भूजल पातळी खालावत आहे.