शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट पालिकेला ‘अ’ दर्जा प्राप्त

By admin | Updated: January 15, 2016 02:56 IST

येथील नगरपालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला असून तशी शासनाची अधिसूचना जारी झाली आहे.

शासनाची अधिसूचना जारी : अनुदान वाढीसह नागरी सुविधांत होणार वाढ हिंगणाट : येथील नगरपालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला असून तशी शासनाची अधिसूचना जारी झाली आहे. या पालिकेला पूर्वी ‘ब’ वर्ग होता. पालिका ‘अ’ वर्ग मिळाल्याने येथील नागरिकांना त्या दर्जाच्या सुविधा मिळणार आहे. या पालिकेला मिळणारे अनुदानही याच वर्गानुसार मिळणार असून येथे कर्मचारी संख्येतही वाढ होणार आहे. हिंगणघाट शहराच्या विकासासाठी १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून नागरिकांना सेवा पुरविणाया या नगरपालिकेला यापूर्वी ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त होता. ११ जानेवारी २०१६ च्या महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाद्वारे जारी झालेल्या अधिसूचनेनुसार या पालिकेला ‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. वाढलेल्या दर्जामुळे पालिकेला मिळणाऱ्या अनुदानात वाढ होण्याची शक्यता असून पालिकेच्या कर्मचारी संख्येतही वाढ होणार आहे. शहरासाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत. ब्रिटीश काळातील ही पालिका येत्या वर्षात दिडशे वर्षाची होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. १८६७ मध्ये ही पालिका शासन नियुक्त प्रशासकीय अधिकारी चालवित होते. १९०१ मध्ये पालिका १२ सदस्याची झाली. तेव्हा शहराची लोकसंख्या १२,६२२ एवढीच होती. सन १९१८ मध्ये लोकप्रतिनिधींच्या हाती कार्यभार आला. सन १९८६-८७ मध्ये नगराचे क्षेत्रफळ ६.४८ चौरस किलोमिटर आणि ३९ प्रभाग होते. सध्या हिंगणघाट नगरपालिकेत एकूण ३३ सदस्य (नगरसेवक) आहेत.‘अ’ वर्गाचा दर्जा प्राप्त झाल्याच्या निर्णयाचे नगरपालिकेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, उपाध्यक्ष निलेश ठोंबरे यांनी नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यात अग्रेसर राहून शहराच्या विकासासाठी आणखी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.(शहर प्रतिनिधी)