अतिवृष्टीने साहूरात शेतकऱ्यांची ज्वारी काळवंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:00:25+5:30

साहूर येथील राजेंद्र गावंडे यांची मौजा रुद्रापूरमध्ये सर्व्हे नं. ६३, ६४ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी ज्वारीला चांगला भाव मिळतो म्हणून यावर्षी ज्वारीची पेरणी केली. पीकही जोमाने वाढले. आता उत्पादन हाती येण्याची वेळ आली होती आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाने घाला घातला. संपूर्ण शेतातील ज्वारी काळी पडली. या पिकाला काहीही किंमत राहिली नाही. हातचे पैसेही गेले आणि मनुष्यबळाची मेहनत, लाभ काहीच झाला नाही. त्यामुळे फार वाईट वेळ आली आहे.

Heavy rains caused a tide of farmers in the sea | अतिवृष्टीने साहूरात शेतकऱ्यांची ज्वारी काळवंडली

अतिवृष्टीने साहूरात शेतकऱ्यांची ज्वारी काळवंडली

Next
ठळक मुद्देओढविले संकट : शासनाने आर्थिक मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : अतिवृष्टीमुळे काळ्या मातीच्या कुशीत वाढलेली हिरवीगार पीक क्षणार्धात मातीसारखे काळे झाले. राजेंद्र गावंडे यांच्या शेतातील ज्वारी पूर्णत: खराब झाली आहे. शासनाने मात्र अद्यापही मदतीचा हात दिलेला नाही.
साहूर येथील राजेंद्र गावंडे यांची मौजा रुद्रापूरमध्ये सर्व्हे नं. ६३, ६४ मध्ये शेती आहे. यामध्ये त्यांनी ज्वारीला चांगला भाव मिळतो म्हणून यावर्षी ज्वारीची पेरणी केली. पीकही जोमाने वाढले. आता उत्पादन हाती येण्याची वेळ आली होती आणि निसर्गाच्या अस्मानी संकटाने घाला घातला. संपूर्ण शेतातील ज्वारी काळी पडली. या पिकाला काहीही किंमत राहिली नाही. हातचे पैसेही गेले आणि मनुष्यबळाची मेहनत, लाभ काहीच झाला नाही. त्यामुळे फार वाईट वेळ आली आहे.
सोयाबीनला कोंब फुटले, काळी पडली, आराजी घटली, कपाशीलाही तेच दिवस आले. त्यामुळे खरीपातील हक्काची पीक न पेरलेली बरी अशी प्रतिक्रिया गावंडे यांनी व्यक्त केली आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा अद्यापही सर्व्हे केला नाही. कृषी आयुक्त, महसुल आयुक्त, ग्रामविकास विभागाचे आयुक्त यांचा कुठलाही शासन आदेश नाही. यावरून बळीराजा किती खचला असेल याची कल्पनाही करवत नाही. शासनाने तात्काळ सरसकट नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ५० हजार रूपये द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अशीच अनेक शेतकºयांची स्थिती आहे.

Web Title: Heavy rains caused a tide of farmers in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती