किशोरी मेळाव्यात युवतींना आरोग्यविषयक धडे

By Admin | Updated: December 21, 2015 02:21 IST2015-12-21T02:21:01+5:302015-12-21T02:21:01+5:30

डॉ. सुशीला नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सामूदायिक वैद्यक विभागाच्यावतीने किशोरी मेळावा घेण्यात आला.

Health Lessons to Youth in Kishori Melawa | किशोरी मेळाव्यात युवतींना आरोग्यविषयक धडे

किशोरी मेळाव्यात युवतींना आरोग्यविषयक धडे

१२८ मुलींची तपासणी तर १६० किशोरींचा सहभाग
सेवाग्राम : डॉ. सुशीला नायर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या सामूदायिक वैद्यक विभागाच्यावतीने किशोरी मेळावा घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्र सालोड (हि) येथे पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुरेखा वांदिले तर अतिथी म्हणून नलिनी भोयर, यमू मचाले, प्रा. विद्या राईकवार, डॉ. रवीराज कांबळे, प्रवीण भुसारी, डॉ. विना गभणे, सुनील लोहे आदी उपस्थित होते.
प्रा. राईकवार यांनी मुलींमध्ये होणारा शारीरिक व मानसिक बदल, डॉ. कांबळे यांनी रक्तक्षय, भुसारी यांनी पोषण आहार व नाही कसे म्हणावे, डॉ. गभणे यांनी मासिक पाळी या विषयांवर माहिती देत जाणीव करून दिली. मेळाव्यात १६० मुली सहभागी झाल्या होत्या. सिकलसेल तपासणी मध्ये १२८ मुलींनी स्वत:ची तपासणी करून घेतली. बेटी बचाव, बेटी पढाव, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा यावर पथनाट्य सादर करण्यात आले. संचालन अर्पित भोयर व देवयानी राऊत यांनी केले तर आभार अश्विनी डंभारे यांनी मानले. मेळाव्याला नरेश महाडुले, तेजश्री व चंदा भोंडवे, तपासणीसाठी सयाम, भापकर यांच्यासह पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.(वार्ताहर)

Web Title: Health Lessons to Youth in Kishori Melawa