"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला

Bethell gold chain incident: आरसीबी आणि केकेआरच्या सामन्यात किंग कोहलीच्या शतकाची चर्चा तर झालीच, पण एका अजब घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. जेकब बेथलची महागडी चैन खेळपट्टीवरच पडली आणि त्यानंतर देवदत्त पडिक्कलने जे केलं, त्यावर रवी शास्त्रींनीही मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 10:28 IST2026-05-15T10:26:30+5:302026-05-15T10:28:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 Ravi Shastri trolls PSL after Bethell gold chain incident in RCB vs KKR clash | "असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला

"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला

आयपीएल २०२६ च्या ५७ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सवर ६ विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले असले, तरी या सामन्यात घडलेल्या एका अजब घटनेची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत आहे. आरसीबीचा फलंदाज जेकब बेथल बाद होऊन जात असताना त्याची सोन्याची चैन खेळपट्टीवरच पडली, जी नंतर देवदत्त पडिक्कलने उचलून अंपायरकडे सुपूर्द केली. पडिक्कलचा प्रामाणिकपणा पाहून भारताचे माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री भलतेच खूश झाले आणि त्यांनी आयपीएलची तुलना थेट पाकस्तानच्या पीएसएलशी केली.

आरसीबीच्या डावातील चौथ्या षटकात केकेआरचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी गोलंदाजी करत होता. त्यागीने १४४ किमी प्रति तास वेगाने एक तीक्ष्ण बाउन्सर टाकला. हा चेंडू जेकब बेथलच्या हेल्मेटवर आदळला. चेंडू हेल्मेटवर इतक्या जोरात लागला की, त्या धक्क्यामुळे जेकबच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटली आणि खेळपट्टीवर पडली. आपण बाद झालो आहोत या विचारात असलेल्या जेकबला आपली चैन पडल्याचे लक्षातही आले नाही आणि तो तसाच पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. त्यानंतर मैदानात आलेल्या पडिक्कलची नजर क्रीजवर पडलेल्या जेकबच्या चैनवर पडली. पडिक्कलने तात्काळ ती चैन उचलली आणि सुरक्षिततेसाठी मैदानातील पंचांकडे सोपवली, जेणेकरून ती जेकबला परत मिळेल. यावर रवी शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया दिली. रवी शास्त्री म्हणाले की, "पडिक्कलने बेथलची सोन्याची चैन परत केली. अशा गोष्टी तुम्हाला फक्त आयपीएलमध्येच पाहायला मिळतील, शेजारच्या लीगमध्ये नाही." शास्त्री यांच्या या विधानाचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

आरसीबीचा दणदणीत विजय

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने अंगकृश रघुवंशीच्या ७१ धावांच्या जोरावर १९२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात आरसीबीचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने शानदार पुनरागमन करत नाबाद १०५ धावांची शतकी खेळी केली. कोहली आणि पडिक्कल (३९ धावा) यांच्यातील महत्वपूर्ण भागीदारीमुळे आरसीबीने ५ चेंडू राखून हा सामना जिंकला.

Web Title : सिर्फ आईपीएल में: पडिक्कल की ईमानदारी और शास्त्री का पीएसएल पर तंज।

Web Summary : आईपीएल में, पडिक्कल ने बेथेल की चेन लौटाई, जिससे शास्त्री ने आईपीएल की पीएसएल से बेहतर तुलना की। कोहली के शतक की बदौलत आरसीबी ने केकेआर को हराया।

Web Title : Only in IPL: Padikkal's honesty and Shastri's dig at PSL.

Web Summary : In IPL, Padikkal returned Bethell's chain, prompting Shastri to compare IPL favorably to PSL. RCB defeated KKR thanks to Kohli's century.