शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरमधील पिकांची नासाडी

By admin | Updated: July 29, 2014 23:58 IST

येथील परिसरात फार मोठा पाऊस झाला नसला तरी मध्य प्रदेशातील संततधार पावसाने अप्पर वर्धा व लोअर वर्धा या दोन्ही धारणाचे सर्वच दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ त्यामुळे वर्धा नदीला पूर आला़

फणिंद्र रघाटाटे - रोहणायेथील परिसरात फार मोठा पाऊस झाला नसला तरी मध्य प्रदेशातील संततधार पावसाने अप्पर वर्धा व लोअर वर्धा या दोन्ही धारणाचे सर्वच दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ त्यामुळे वर्धा नदीला पूर आला़ त्यामुळे रोहणा परिसरातून वाहणाऱ्या भोलेश्वरी नदीला व अनेक नाल्यांचा प्रवाह वाढून रोहणा, वाई, दहयापूर, दिघी, सायखेड, वडगाव व धनोडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीवरील पिकात पाणी शिरले. परिणामी परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करून जगविलेल्या पिकांची नासाडी झाली़ २७ व २८ जुलैला रोहणा परिसरात फार मोठा पाऊस झाला नाही़ तरीही वर्धा नदीला मोठा पूर आला़ मध्यप्रदेशात व अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वर्धा नदीला पूर आला़ त्यातच अप्पर वर्धा व लोअर वर्धा धरणाचे सर्वच दरवाजे उघडे केल्याने वर्धा नदीला पूर आला़ अनेक ठिकाणी वर्धा नदीचे पाणी काठाच्या बाहेर आले. परिसरातील भोलेश्वरी नदी व नाल्यांचे पाणी वर्धा नदीला येवून मिळते. पण ते पाणी वर्धा नदीत सामावू शकत नसल्याने मागे सरकू लागले़ परिणामी नदी नाल्यांना थोप येवून त्यांचे पाणी परिसरातील शेतात पसरले़ यात रोहणा येथील गजानन थोटे, प्रकाश थोटे, शरद कडू, प्रमोद केने, सुरेश चाफले, लक्ष्मण थोटे, रावसाहेब वाघ, देवीदास मांढरे, सतीश जुवारे, सतीश आटे, संजय रणनवरे, सुभाष वाघ, बाळा शिंदे, विनायक डहाके यांच्यासह अनेकांचे तसेच दिघी, सायखेड, वडगाव व धनोडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील दुबार-तिबार पेरणीनंतरचे पीक पूर्णत: खराब झाले़ सर्व शेतकऱ्यांनी १५, १६ व १७ जून रोजी झालेल्या पावसानंतर पेरणी केली होती़ पण नंतरच्या तीव्र उन्हात सदर पेरणी वाया गेली़ दुसरी पेरणी २३ जुलैला आलेल्या पुरात खराब झाली़ नुकतीच या सर्व शेतकऱ्यांनी २४ जुलैपासून तिबार पेरणी केली. पण २८ जुलैला आलेल्या पुरात पुन्हा नुकतेच अंकुरलेले पीक नष्ट झाले़ वर्धा नदीला पूर असताना धरणातील पाणी सोडल्यावर नदी काठावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येते़ पण ही बाब लोअर व अप्पर वर्धा प्रकल्पातील वरिष्ठ अभियंते मानायला तयार नाही. म्हणून रोहणा येथील पीडित शेतकऱ्यांनी प्रकल्पातील वरिष्ठ अभियंत्यांना शेतात पसरलेले पाणी पाहण्याची विनंती केली. अनेकांनी येण्याचे टाळत साईट सुपरवायझर डांगोरे यांना पूरपरिस्थितीचे अवलोकन करून अहवाल सादर करण्याचा तोंडी आदेश दिला़ शेतकऱ्यांनी डांगोरे यांना सोबत नेवून नुकसान दाखविले़ असता त्यांनीही पिके नष्ट झाल्याची बाब मान्य केली. दरवर्षीच हे नुकसान होत असल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे़