शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बोंदुर्णीत वाहतो गावठी दारूचा महापूर

By admin | Updated: June 4, 2014 23:58 IST

वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या बोंदूर्णी गावाला दारूभट्टय़ांचा विळखा पडला आहे. सकाळपासूनच दारूभट्टय़ांतून निघणारा धूर, मद्यपींचा वावर यामुळे गावाचे धोक्यात आलेले सामाजिक आरोग्य या

वर्धा : वडनेर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या  बोंदूर्णी गावाला दारूभट्टय़ांचा विळखा पडला आहे. सकाळपासूनच दारूभट्टय़ांतून निघणारा धूर, मद्यपींचा वावर यामुळे गावाचे धोक्यात आलेले सामाजिक आरोग्य या सर्व प्रकाराला बोंदुर्णीवासीय त्रस्त झाले आहेत. याप्रकारे अवैधरीत्या दारूचा गाळप करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करीत आरोपींना गजाआड करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.यापूर्वी ग्रामस्थांनी वडनेर पोलीस ठाण्यात जाऊन ठाणेदारांकडे तक्रार केली होती; मात्र त्यांच्या तक्रारीला नेहमीप्रमाणे केराची टोपली दाखविण्यात आली. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने या दारूविक्रेत्यांचे मनोबल कमालीचे वाढले आहे. येथे खुलेआम दारूविक्री होत असल्याने परिसरातील गावांमधील शौकिनही बोंदुर्णीत दारू ढोसायला येतात. यामुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. मद्यपींमुळे बरेचदा वादावादी होते. यात ईल शिवीगाळ केली जाते. गावातील महिलांची मोठी कुचंबना होते. त्यामुळे महिला सहसा घरातून बाहेर पडण्यास धजावत नाही. युवतींनाही या मद्यपींकडून वाहक त्रास सहन करावा लागतो.याशिवाय ही दारू काढताना यात अनेक विषारी पदार्थाचा वापर असल्याने आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. यात सडवा रसायनासोबतच बेशरमचा पाला, तुरटी, तंबाखू, नवसागर टाकले जाते. ही दारू आरोग्यावर विपरीत परिणाम करीत आहे. परिणामी गावातील अनेकांना किडनीच्या संबंधित आजाराची लक्षणे दिसून येत आहे.  ही गंभीर समस्या असून याला वेळीच आळा घातला न गेल्यास याचे दूरगामी परिणाम होण्याचा धोका आहे. वडनेर पोलिसांनी याप्रकारे विषारी पदार्थांंचा वापर करून दारू बनविणार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय गावाच्या शिवारात अवैधरित्या दारूचा गाळप करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)