शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ढोबळमानाने शेतकऱ्यांना मदतीची मागणी

By admin | Updated: March 29, 2017 00:58 IST

तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे.

आष्टी(श.) : तालुक्यात लागोपाठ झालेल्या सात शेतकरी आत्महत्या कर्जाच्या व पिकाच्या कारणामुळेच झाल्या हे सत्य आहे. पण शासकीय अधिकारी वास्तव मानायला तयार नाही. केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढू धोरणाचा स्वीकार होताना दिसत आहे. आत्महत्या झाल्याचे बोलके वास्तव पोलीस पंचनामा झाल्यावर समोर येते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत देणे शक्य आहे अथवा नाही, त्याची आत्महत्या निकशात बसते अथवा नाही, याचा निर्णय घेण्याकरिता जिल्हाधिकारी, विविध अधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी या सर्वांची कमिटी त्यावर विचार करते. यामध्ये कागदी घोडे बरोबर नसल्याचे कारण पुढे करून मंजूर प्रकरण नामंजूर केल्या जाते. घरच्या कर्त्याने आत्महत्या केल्यावर जीवंत राहिलेली घरातील माणसे काळजीने मरणाच्या घटका मोजतात. ही सगळी वस्तुस्थिती शासनाने स्वीकारावी अशी समाजाकडून अपेक्षा असते. शासनाकडून मदतीची अपेक्षा असते. प्रत्यक्ष अनुभवानुरूप येथे अपेक्षांचा भंग होत असल्याचे दिसते. गत अनेक वर्षांपासून कर्जाच्या विळख्यात भरडल्या जात असलेला शेतकरी आशेवर जीवन जगत आहे. दरवर्षी पीक लागवडीचा खर्च व अत्यल्प उत्पादन याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचा निर्धार करतो. शेतकरी आत्महत्या झाल्यावर कुटुंबाचे सांत्वन करायला अधिकारी तथा लोकप्रतिनिधी यांची उदासीनता दिसून येते. सामाजिक दायीत्व जोपासण्याचा निर्धार कुणीही स्विकारत नाही. शेतकऱ्यांसाठी शासनाने ढोबळमानाने मदत करायची मागणी आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाला याबाबत निवेदन पाठविण्यात आले आहे.(तालुका प्रतिनिधी)