शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शासन आणि समाज यात एक सुदृढ नाते हवे- विनायक देशपांडे

By admin | Updated: January 12, 2016 01:49 IST

शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे.

कमलनयन बजाज परिसंवाद स्पर्धा : अमरावतीचा अनिरूद्ध महाजन प्रथम वर्धा : शासन व समाज हे परस्पर पूरक असतात. राष्ट्राला विकासपथावर न्यावयाचे असेल तर शासन आणि समाज यामध्ये एक सुदृढ नाते असणे आवश्यक आहे. समाज सतत जागरूक असावयास हवा. त्याकरिता सुशिक्षितांचा त्यात सहभाग वाढणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन रा.तु.म. नागपूर विद्यापीठ, नागपूरचे माजी कार्यकारी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी केले. शिक्षा मंडल, वर्धा द्वारा आयोजित ४२ व्यास कमलनयन बजाज स्मृती आंतरविद्यापीठ परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अतिथी म्हणून ते बोलत होेते. यावेळी विचार व्यक्त करताना डॉ. देशपांडे म्हणाले, ‘शासन आणि समाज’ यामध्ये दरी वाढताना दिसते. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वाढणारे खाजगीकरण हे होय. आधुनिक समाजात माणसापेक्षा पैशाला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. यामुळे इकॉनॉमिक्स बरोबरच इगोनॉमिक्सही वाढलेले दिसते. शासन व समाज यामधील दरी दूर करण्यात शिक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. परिसंवादाच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात जा.ब. विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांच्या चमूने सादर केलेल्या समारोप गीताने झाली. याप्रसंगी व्यासपीठावर शिक्षा मंडल, वर्धाचे उपाध्यक्ष भरत महोदय, सभापती संजय भार्गव, सहसचिव पुरूषोत्तम खेमुका, परीक्षक डॉ. अनिल ढगे, डॉ. अन्वर सिद्दीकी व परिसंवादाचे समन्वयक डॉ. शेषराव बावनकर उपस्थित होते.यावेळी संजय भार्गव यांच्यासह या स्पर्धेचे परीक्षक डॉ. अनिल ढगे व डॉ. अन्वर सिद्दिकी यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्राचार्य डॉ. ओम महोदय यांनी केले तर आभार डॉ. शेषराव बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षा मंडलचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी तथा शहरातील गणमान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(प्रतिनिधी)