शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खाकीतील देवदूतांसाठी राबताहेत खासदारांच्या सौभाग्यवती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

कोरोनामुळे उद्धभवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व अंगणवाडी सेविका देवदूताप्रमाणे रस्त्यावर उतरुन इतरांसाठी आपल्या जिवाचे रान करीत आहे. सीमाबंदी व जमावबंदी असल्याने संरक्षणाची आणि बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर आहे. शिवाय ते कर्तव्य बजावत आहे.

ठळक मुद्देपोलिसांच्या कर्तव्याप्रति कृतज्ञता : दररोज तयार करतात खाद्यपदार्थ, सूपुत्रासह नगरपालिकेचे उपाध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांचे मिळतेय सहकार्य

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असताना आपले आरोग्य सांभाळण्यासाठी सारेच घरात बसून आहेत. मात्र, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून समाजासाठी दिवसरात्र रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. अशा या देवदूतांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी खुद्द खा. रामदास तडस यांच्या सौभाग्यवती शोभा तडस यांनी पुढाकार घेतला आहे. मोठेपणा विसरुन दररोज स्वत:च्या हाताने अल्पोहार बनवून तो पोलीसदादांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करतात.कोरोनामुळे उद्धभवलेली आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग व अंगणवाडी सेविका देवदूताप्रमाणे रस्त्यावर उतरुन इतरांसाठी आपल्या जिवाचे रान करीत आहे. सीमाबंदी व जमावबंदी असल्याने संरक्षणाची आणि बंदोबस्ताची जबाबदारी पोलीस प्रशासनाच्या खांद्यावर आहे. शिवाय ते कर्तव्य बजावत आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व खानावळी, हॉटेल, चहा कॅन्टीन बंद असल्याने कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अल्पोहार व जेवणाची गैरसोय होत आहे. पोलिसांना आपल्या पोलीस ठाण्यापासून किंवा चौकीपासून दूरवर कर्तव्य बजवावे लागत असल्याने तेथे कोणतीही सोय उपलब्ध नाही. परिणामी त्यांना पाण्याचे घोट गिळून किंवा जवळ असलेल्या खाद्यपदार्थावरच दिवस काढावा लागतो. समाजाच्या रक्षणार्थ पोलिसांचा होणारा पोटमारा लक्षात घेऊन ३१ मार्चपासून खा. तडस यांनी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अल्पोहाराची व चहाची व्यवस्था करण्याची जबाबदारी स्वीकारली. तर त्यांच्या सौभाग्यवती, देवळीच्या माजी नगराध्यक्षा तथा गटनेत्या शोभा तडस यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत दररोज अल्पोहार व चहाची व्यवस्था स्वत: करतात. त्यांना नगरपालिकेचे उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, विभा बजाईत, सुनंदा, जगदंबा यादव सहकार्य करीत आहे. सुपूत्र पंकज तडस यांच्या नियंत्रणात रवी कारोटकर, उमेश कामडी, सुरज कानेटकर, प्रशांत डुकरे हे देवळी तालुक्यातील शिरपूर येथील पोलीस चौकी, अंदोरी येथील पोलीस चौकी, देवळी शहर पोलीस स्टेशन तसेच शिवसेना चौक, बसस्थानक चौक, बाजार चौक, देवळी नाका, ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद आदी ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसह इतर कर्मचाºयांनाही दररोज दुपारी अल्पोहार व चहा पोहोचवितात. यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही मोठा आधार मिळत आहे.कोरोना विषाणूपासून नागरिकांना सतर्क राहण्यासाठी स्वत:ची तहान-भूक विसरून पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी तसेच वैद्यकीय कर्मचारी हे कोरोना योद्धा रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्या या कामगिरीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सुरु केलेले हे कार्य फार लहान आहे. या निमित्ताने का होईन अशा खºया देवदूतांची सेवा करण्याची एक संधी मिळाली आहे.- शोभा तडस, माजी नगराध्यक्ष, देवळीजागतिक आपत्तीच्या काळात जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग दिवसरात्र कर्तव्य बजावत आहे. त्यांच्या या कार्याला तोड नाही. सध्या देवळी पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सर्व पोलीस कर्मचाºयांसाठी अल्पोहार आणि चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. आज हनुमान जयंतीपासून वर्धा शहरातील पोलीस कर्मचाºयांना अल्पोहार आणि चहा देण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे.- रामदास तडस, खासदार.