शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीकृतऐवजी हस्तलिखित सात-बारा द्या

By admin | Updated: May 1, 2015 01:44 IST

शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.

हिंगणघाट : शेतकऱ्यांना हस्तलिखित सात बारा मिळावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानच्यावतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सध्या शेतकऱ्यांना सात बारा हा आॅनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून आदेश निघाला असून एका दिवसात मिळणारा सातबारा यापुढे शेतकऱ्यांना तीन ते चार महिन्यानंतर मिळणार आहे.निवेदन सादर करताना किसान अधिकार अभियानचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. तलाठ्याने संबंधित शेतकऱ्यांची संपूर्ण माहितीची सीडी तयार करून ती आॅनलाईन पद्धतीने संगणकीकृत करून त्याद्वारे सात बारा देण्यात येणार आहे. हा आॅनलाईन पद्धतीने दुरूस्त झालेल्या खसरा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. शेतकरी पुढील महिन्यापासून नवीन हंगामाच्या तयारीला लागला आहे. नवीन हंगामात बँकेकडून कर्ज घ्यावे लागल्यास आॅनलाईन सात बारा शेतकऱ्यांना वेळीच मिळाला नाही तर कर्ज मिळण्यात अडचण येणार आहे. शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच हस्तलिखित सात बारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी किसान अधिकार अभियानने यावेळी निवेदनातून केली. यावेळी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)