शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचीच सरशी

By admin | Updated: May 26, 2016 01:00 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के : १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्णवर्धा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी/मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल ८३.५२ टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत निकालाची टक्केवारी घसरली. गतवर्षी ८८.८६ टक्के एवढा निकाल होता. सतत तिसऱ्या वर्षी ही घसरण कायम आहे. यंदाही जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी आघाडी घेतली असून पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींची आघाडी कायम राहिली. जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेत पहिला येण्याचा मान यंदा वर्धा येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेजच्या स्वराली विलास घोडखांदे या विद्यार्थिनीने पटकाविला. तिला ६५० पैकी ६२४ गुण (९६ टक्के) मिळाले. प्रियाली संजय गाठे ही जिल्ह्यातून दुसरी आली. ती वर्धा येथील गांधीग्राम विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६११ गुण (९४ टक्के) मिळाले. तृतीय स्थान कल्याणी ज्ञानेश्वर लोणकर हिने मिळविले असून ती वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात पहिली आली आहे. तीसुद्धा वर्धा येथील गो.से. वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिला ६५० पैकी ६१० गुण (९३.८५ टक्के) मिळाले. नागपूर विभागाचा निकाल १ वाजता आॅनलाईन जाहीर होताच तो पाहण्यासाठी मुलांची धावपळ सुरू होती; पण स्मार्टफोनच्या जगात निकाल प्रत्येकाच्या हाती असल्याचे चित्र होते. ज्यांच्या स्मार्ट फोन नव्हते, ते सायबार कॅफेत गर्दी करताना दिसून आले.जिल्ह्यातील एकूण १३४ उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतून एकूण १६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला होता. यापैकी १६ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील १३ हजार ८७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ६ हजार ६४८ मुले तर ७ हजार २३१ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ७९.७२ टक्के तर मुलींची टक्केवारी ८७.३५ एवढी आहे.