शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य होम क्वारंटाईन, अधिकारी नो क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:01 IST

शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढणे व आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देबाहेर जिल्ह्यातून ये-जा कायम: नागपुरातील बैठकीलाही अधिकाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता सर्वसामान्यांना ई-पास काढणे तसेच बाहेर जिल्ह्यातून आल्यानंतर १४ दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक केले आहे. मात्र, हा नियम शासकीय अधिकारीच पाळत नसल्याचे दिसून येत आहे. आजही दुसऱ्या जिल्ह्यातून अधिकाऱ्यांची ये-जा सुरु असून वर्ध्यातील अधिकारी नागपुरमध्ये बैठकीला जात आहे. पण, ते क्वारंटाईन होत नसल्याने कोरोनाचा संसर्ग फक्त सर्वसामान्यांमुळेच होतो काय? असा प्रश्न वर्धेकरांकडून उपस्थित केल्या जात आहे.शासनाने कोरोनाच्या चवथ्या लॉकडाऊन काळामध्ये बºयाच प्रमाणात शिथिलता दिली आहे. तसेच शिथिलतेच्या तिसºया टप्प्यात शासकीय कार्यालयातील उपस्थिती संख्या वाढविण्याबद्दलही आदेश दिले आहे. मात्र, जिल्हाबंदी अद्याप कायम आहे. बाहेर जिल्ह्यात जाण्याकरिता ई-पास काढणे व आल्यानंतर १४ दिवस क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. पण, आजही बहुतांश शासकीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुख अधिकारीच नागपूर जिल्ह्यातून ये-जा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.प्रशासनाला कोणतीही माहिती न देता कार्यालयात येणे आणि निघून जाणे असा त्यांचा दिनक्रम सुरु आहे. विशेषत: पशुसंर्वधन विभागाची सोमवारी नागपुरला बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीला वर्ध्यातील जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे व जिल्हा उपायुक्त डॉ. राजीव भोजने हे दोन्ही अधिकारी उपस्थित होते. आता हे अधिकारी वर्ध्यात आल्यानंतर नियमानुसार होम क्वारंटाईन होणार का? तसेच इतरही विभागाचे अधिकारी बैठकीकरिता नागपुरला जात असल्याने तेही क्वारंटाईन होतात का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्ह्याच्या बाहेर जावून आल्यानंतर शासनाच्या नियमावलीनुसार १४ दिवस होम क्वारंटाईन होणे बंधनकारक आहे. पण, काही अधिकारी नागपुरला बैठकीनिमित्त जात असल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांची चर्चा झाली करण्यात आली असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.हेटी (कुंडी) येथील गवळाऊ पशुपैदास केंद्रासंदर्भात मंत्रीमहोदयांनी नागपुरात बैठक बोलावली होती. त्या बैठकीला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.डायगव्हाणे व मी उपस्थित होतो. इतर जिल्ह्यातील अधिकारी या बैठकीला आले होते. वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे आम्हाला नागपुरला जावे लागले.- राजीव भोजने, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, वर्धा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या