शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना बीएलओच्या कामातून मुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

बी.एल.ओ. च्या कामाकरिता शाळेच्या कामकाजातून तात्पुरती सूट मिळत असली तरी शिक्षकांचे अभ्यासक्रम बी.एल.ओ. च्या कामामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था शालेयस्तरावर केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ठळक मुद्देशिक्षक परिषदेची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षकांना बी.एल.ओ. च्या कामातून मुक्त करा, अशी मागणी उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना निवेदनातून करण्यात आली. शिक्षकांची बी.एल.ओ. म्हणून केलेली नियुक्ती आणि त्यातून वर्षभर चालणारे मतदार याद्याबाबतचे काम यामुळे शिक्षकांच्या मूळ अध्यापन व इतर कामांवर परिणाम होत आहे. याचे वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययन कौशल्यावर होत आहे. तसेच अध्यापनाचे काम सुध्दा व्यवस्थित होत नसल्याने शिक्षकांना पालकांच्या रोषाला समोर जावे लागत आहे.बी.एल.ओ. च्या कामाकरिता शाळेच्या कामकाजातून तात्पुरती सूट मिळत असली तरी शिक्षकांचे अभ्यासक्रम बी.एल.ओ. च्या कामामुळे पूर्ण होत नाही. त्यासाठी दुसरी पर्यायी व्यवस्था शालेयस्तरावर केली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असून त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.निवडणूक विभागाच्या आदेशानुसार शिक्षकांना कायम बी.एल.ओ. कामाकरिता नियुक्त करण्याचे आदेश नाहीत. तसेच शिक्षण हक्क कायद्यामधील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्याबाबत प्रतिबंध घालण्यात आले आहे. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने सुद्धा बी.एल.ओ.चे काम ऐच्छिक असल्याबाबतचे आदेश वेळोवेळी दिलेले आहे. या सर्व बाबींकडे गांभीर्याने लक्ष घालून शिक्षकांना बी.एल.ओ. च्या कामातून मुक्त करून पर्यायी व्यवस्था करावी, याबाबत चर्चा करून उपविभागीय अधिकारी बगळे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तक्रार निवारण समितीचे पुंडलिक नागतोडे, अजय भोयर, कुंडलिक राठोड, संतोष महाजन, रवी चौधरी, मुकेश इंगोले, किशोर उमाटे, मारोती सयाम, एन.एन. गोखले, अविनाश धात्रक, रहीम शहा, परमेश्वर केंद्रे, संदीप चांभारे, किशोर ढेंगरे, नितीन वाघ, प्रशांत सयाम, नीलेश भालकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षक