शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

यशोदा नदीपात्रातून चार ट्रक, एक जेसीबी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

सोनेगाव (बाई) येथे यशोदा नदी व भदाडी नदीचा संगम असून त्या ठिकाणी यावर्षीच्या पुरामुळे चांगला वाळूसाठा झाला आहे. त्यामुळे वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपला मोर्चा वळवित रात्री अवैध उपसा सुरू केला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाईकडे कानाडोळा करण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदारांची कारवाई : पावणे चौदा लाखांच्या दंडाची आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथील यशोदा नदीच्या पात्रात अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करणारे चार ट्रक व एक जेसीबी जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार राजेश सरवदे यांनी मंगळवारी रात्री बारा वाजता केली. मध्यरात्री दोन वाजतापर्यंत ही कारवाई करीत पाचही वाहने तहसील कार्यालयात लावण्यात आली.सोनेगाव (बाई) येथे यशोदा नदी व भदाडी नदीचा संगम असून त्या ठिकाणी यावर्षीच्या पुरामुळे चांगला वाळूसाठा झाला आहे. त्यामुळे वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपला मोर्चा वळवित रात्री अवैध उपसा सुरू केला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाईकडे कानाडोळा करण्यात आला. अखेर मंगळवारी रात्रीच्या सुमारास आठ ते दहा ट्रक व जेसीबी वाळूघाटाकडे जात असल्याची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांना देण्यात आली. त्यांनी याबाबत तहसीदलार राजेश सरवदे यांना दिली. तहसीलदारांनी लागलीच वाहनचालकासह वाळू घाटावर धाड टाकली. वाळू घाटात जेसीबीच्या सहाय्याने ट्रक भरले जात होते. त्यामुळे तहसीलदारांनी शेखर लुंगे यांच्या मालकीचे एम.एच. ४० एन. ४८६४ व एम. एच. ३२ बी. ९९५३ क्रमांकाचे दोन, संतोष काशीनाथ नवरंगे यांच्या मालकीचा एमएच ३२ क्यू ६४६२ क्रमांकाचा एक तर विशाल देविदास चौधरी यांच्या मालकीचा एम.एच. ३६ एफ. ०५१७ क्रमाकांचा एक असे चार ट्रक आणि रोशन मिसाळ यांच्या मालकीचा जेसीबी जप्त करण्यात आला. हे सर्व वर्ध्यातील रहिवासी असून त्यांच्या वाहनांवर प्रत्येकी पावणे तीन लाखांप्रमाणे पावणे चौदा लाखांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम वसूल झाल्यानंतर ही सर्व वाहने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील कारवाईकरिता पाठविणार असल्याचे तहसीलदार सरवदे यांनी सांगितले.कारमधून ठेवला जात होता पहारामंगळवारी अंधार होताच वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपली वाहने सोनेगाव (बाई) येथील वाळू घाटाच्या रस्त्याने उभी केली होती. आठ ते दहा मोठे ट्रक व जेसीबीचा यात समावेश होता. तसेच या वाळूचे भरलेले ट्रक मार्गावर लावण्याकरिता तीन ते चार कारही या ट्रकच्या सोबत होत्या. आठ वाजतापासूनच उपसा सुरू केल्याने कारवाईपर्यंत अनेक वाहने भरुन मार्गाने लागली होती. त्यामुळे तहसीलदारांना चारच वाहने मिळून आली. यावेळी एक कारही तहसीलदारांना मिळून आली होती असे गावकरी सांगत आहे. पण; त्या कारचा या कारवाईचा कुठेही समावेश दिसत नाही. त्यामुळे या कारचालकावरही कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :sandवाळू