शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून एकावर गोळीबार, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
3
Jinping on Iran War: इराण युद्ध थांबवण्यासाठी चीनचा पुढाकार, शी जिनपिंग यांनी दिला चार मुद्द्यांचा प्रस्ताव
4
Twisha Sharma : ट्विशा शर्माचा कॉल कट होण्यापूर्वी आईने ऐकलेला आवाज; गच्चीवर तासाभरात नेमकं काय घडलं?
5
"खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलू नका, फक्त क्रिकेटवर लक्ष द्या" रियान पराग समालोचकांवर भडकला!
6
अधिक मास २०२६: १ मंत्र ११ वेळा जपा, अशक्यही शक्य होईल; स्वामी सेवा तारेल, अद्भूत अनुभव येईल!
7
दुचाकीच्या धडकेनंतर लक्झरी बसने घेतला पेट, बाळापूर शेगाव मार्गावरील घटना
8
Twisha Sharma : "३० लोक बोलावून मारहाण करीन"; आता ट्विशा शर्माच्या वहिनीने उघड केला सासरच्यांचा क्रूर चेहरा
9
नवी मुंबई हादरली! घणसोलीत रिक्षाचालकांच्या हाणामारीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या; दोन आरोपींना अटक
10
सांगा..मुंबई कशी तुंबणार नाही! नालेसफाईवेळी नाल्यात सापडला चक्क रिक्षाचा सांगाडा अन् भलीमोठी लोखंडी कचरापेटी
11
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
12
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
13
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
14
हा निव्वळ भास नाही! तुमच्यातल्या 'सिक्स सेन्स'ची जागृती दर्शवणारे 'हे' १० बदल अनुभवलेत का?
15
ऑनलाइन कंपन्यांविरोधात औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप! १५ लाखांहून अधिक मेडिकल दुकाने बंद
16
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
17
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
18
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
19
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
20
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत २.२६ लाख गरजूंना मिळाला शिवभोजनचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला. गरीब व गरजू लोकांना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता  २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्यांतर्गत आठ तालुके मिळून १७ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व  केंद्राला शासनाने प्रतिदिन १ हजार ६०० थाळ्यांचा इष्टांग मंजूर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून शासनाने  १५ एप्रिल २०२१ पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली.  

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना कुणीही गरीब उपाशी राहू नये यासाठी शासनाने १५ एप्रिलपासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली. तसेच जिल्ह्यात शिवभोजन थाळीचा इष्टांक दीड पट वाढवून तो २,१०० पर्यंत दिला. एप्रिल ते ऑगस्ट या चार महिन्यात २ लाख २६  हजार ६०० गरिबांना निःशुल्क शिवभोजन थाळीचा आधार मिळाला आहे. 
शासनाच्या शिवभोजन योजनेचा प्रारंभ राज्यात २६ जानेवारी २०२० पासून सुरू झाला. गरीब व गरजू लोकांना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता शासनाने वर्धा जिल्ह्याकरिता  २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत वर्धा शहर व जिल्ह्यांतर्गत आठ तालुके मिळून १७ केंद्रे सुरू करण्यात आली. या सर्व  केंद्राला शासनाने प्रतिदिन १ हजार ६०० थाळ्यांचा इष्टांग मंजूर केला होता. पण कोरोना काळात कुणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, म्हणून शासनाने  १५ एप्रिल २०२१ पासून नि:शुल्क शिवभोजन थाळी उपलब्ध करून दिली.  
तसेच प्रतिदिन थाळीच्या इष्टांकात  दीड पट वाढ केली.  वर्धा जिल्ह्यात सरासरी १ हजार ८०० ते २ हजार १०० थाळ्यांचा लाभ गरीब व गरजू तसेच अनाथ लोक दररोज या सर्व केंद्रावरून घेत आहे. एकूणच शासनाची ही योजना गरजुंना आधार देणारी ठरत आहे.

१७ केंद्रांना वितरित केले अनुदान
- या योनजेंतर्गत वर्धा जिल्ह्यात एकूण १७ केंद्रावर या थाळीचा लाभ गरीब व गरजू लोक घेत आहे. १५ एप्रिल ते २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात २ कोटी ४३ लाख २३० लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर वर्धा जिल्ह्यातील १७ केंद्रावरून २ लाख २६ हजार ६१३ गरीब व गरजू लोकांनी या थाळीचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे  १७ शिवभोजन केंद्राला शासनाच्या नियमाप्रमाणे  १४ ऑगस्ट २०२१ पर्यंतचे संपूर्ण अनुदान वितरित करण्यात आले आहे.
 

 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय