शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागात नुकसान भरपाईची ३,१९९ प्रकरणे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच शासकीय मदत मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे.

ठळक मुद्देवरिष्ठांना पत्रव्यवहार : पाच महिन्यांपासून छदामही मिळाला नाही

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान व मनुष्याला जखमी अथवा ठार केल्यावर वनविभागाकडून नुकसानग्रस्तांसह त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत दिली जाते. परंतु, मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच शासकीय मदत मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे.प्राप्त माहितीनुसार, जानेवारी २०२० ते मे अखेरपर्यंत वन्यप्राण्यांनी उभ्या पिकांचे नुकसान केल्याची एकूण ३ हजार ३४ प्रकरणे वनविभागाला प्राप्त झाले. चौकशीअंती ही संपूर्ण प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. ही प्रकरणे निकाली काढत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्यासाठी १ कोटी ५१ लाख १६ हजार १३३ रुपयांची गरज आहे. परंतु, मागील पाच महिन्यांपासून वर्धा उपवनसंरक्षक कार्यालयाला शासनाकडून निधीच न मिळाल्याने शासकीय मदत वितरीत करण्यासाठी वर्ध्याचा वनविभाग सध्या हतबल झाला आहे. तर मागील पाच महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी झाल्याची १७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. या जखमींना एकूण १० लाख ८९ हजार ८८९ रुपयांची शासकीय मदत देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. मात्र, निधीच न मिळाल्याने हेही काम रखडले आहे. लवकरच शासनाकडून नुकसान भरपाईपोटीचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त येईल, अशी अपेक्षा वनविभागाला आहे.पशुपालकांच्या अडचणीत भरवन्यप्राण्यांनी पाळीव जनावरांना ठार केल्याची १४८ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. या प्रकरणांचा अंतिम निपटारा करण्यासाठी सदर पशुपालकांच्या बँक खात्यात झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख २३ हजार ५६४ रुपये वळते करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, निधीच नसल्याने शासकीय मदत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याने नुकसानग्रस्त पशुपालकांच्या अडचणीत भर पडली आहे.मागील पाच महिन्यांपासून निधी न मिळाल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वळती करण्यात आलेली नाही. निधी मिळावा म्हणून संबंधितांकडे दोन वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहे. शासनाकडून लवकरच निधी मिळेल, त्यानंतर नुकसानग्रस्तांना निधीचे वितरण करण्यात येईल.- तुषार दमडेरे, सहाय्यक वनसंरक्षक, वर्धा.

टॅग्स :forest departmentवनविभाग