शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अन्न वाचवा मोहिमेची मुहूर्तमेढ

By admin | Updated: March 29, 2017 00:54 IST

मंगल कार्यालये, हॉटेल तथा उपहारगृहांमध्ये अन्न शिल्लक राहते. शिवाय अनेक जण प्लेटमध्येही अन्न शिल्लक ठेवतात.

मंगल कार्यालयांचा सहभाग : गुढी पाडव्याला शुभारंभ हिंगणघाट : मंगल कार्यालये, हॉटेल तथा उपहारगृहांमध्ये अन्न शिल्लक राहते. शिवाय अनेक जण प्लेटमध्येही अन्न शिल्लक ठेवतात. हे अन्न वाया जात असतानाच काही बालके अन्नाविना मृत्यूमुखी पडतात. ही बाब लक्षात घेत पर्यावरण संवर्धन संस्था व लोकसाहित्य परिषदेच्यावतीने ‘अन्न वाचवा’ ही जणजागृती मोहीम सुरू करण्यात आली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. शहरातील मंगल कार्यालयांनी यात सहभाग घेऊन आदर्श घालून दिला आहे. मंगल कार्यालये लग्न आणि इतर शुभ कार्यांसाठी सोयीस्कर असल्याने शहरी नागरिकांसोबतच आता ग्रामीण भागातील लोकही मंगल कार्यालये शुभ कार्यासाठी वापरताना दिसतात. परिणामी, दररोज बहुतेक कार्यालये बुक असतात. सर्व कार्य जरी यथोचित पार पडले तरी सर्वात मोठी समस्या असते उर्वरित आणि प्लेट्समध्ये शिल्लक ठेवलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे. बुफेचे फॅड असल्याने मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडीच होते. एकीकडे अन्नावाचून मुले मरत असताना मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाऊ नये म्हणून येथील पर्यावरण संवर्धन संस्था आणि लोकसाहित्य परिषदेच्यावतीने ‘अन्न वाचवा’ ही जणजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. यातील एक भाग म्हणून हिंगणघाट शहरातील मोठ्या मंगल कार्यालयांच्या संचालकांची भेट घेऊन या समस्येवर चर्चा करण्यात आली. या मोहिमेला मंगल कार्यालय संचालकांनीही सहकार्य करण्याचे ठरविले असून यातून त्यांनी एक अनोखा आदर्शच घालून दिला आहे. मोहिमेला माजी नगरसेवक जनार्धन निखाडे, भास्कर कलोडे, विजय राठी, राजेंद्र राठी, नगरसेवक चंदू मावळे, रमेश दीक्षित, पांडुरंग तुळसकर, जी.एम. लॉनचे भुते, लक्ष्मी कार्यालयाचे महाकाळकर आदींनी सहकार्य करीत मोहीम यशस्वी करण्याची ग्वाही दिली. पर्यावरण संवर्धन संस्थेच्यावतीने अन्नाची नासाडी न करता बचतीचे आवाहन करण्यात आले. यावेळी आशिष भोयर, प्रा अभिजीत डाखोरे, प्रदीप गिरडे, रमेश झाडे, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र कोंडावार, मनोहर ढगे, गौरव जामुनकार, गिरीधर काचोळे, योगेश तपासे, छत्रपती भोयर तसेच दोन्ही संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी मंगल कार्यालयांचे अनेक सामाजिक संस्थांनी कौतुक केले असून पर्यावरण प्रेमींनी या उपक्रमाचे स्वागत केले.(तालुका प्रतिनिधी) सहा कार्यालयांमध्ये लावले फलक अन्न वाचवा या मोहिमेच्या अनुषंगाने दोन मोठे फलक तयार करण्यात आले आहेत. यातील एका फलकावर अन्न वाचविणे किती महत्त्वाचे आहे, याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दुसऱ्या फलकावर एका भुकेल्या मुलाचे छायाचित्र काढण्यात आले आहे. तो डॉक्टरला भूक लागू नये म्हणून औषधी मागत असल्याचा आशय रंगविण्यात आला आहे. या फलकांतून अन्न वाचविण्याची पे्ररणा मिळणार आहे. सदर फलक मंगल कार्यालयांतील जेवणाच्या हॉलमध्ये लावण्यात आले आहेत. मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हे फलक शहरातील कलोडे सभागृह, निखाडे सभागृह, माहेश्वरी भवन, मोहता भवन, शिवसुमन भवन आणि लक्ष्मी भवन या कार्यालयांमध्ये लावण्यात आले आहेत. या मंगल कार्यालयांच्या संचालकांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे.