गर्दीच्या ९६ ठिकाणी ड्रोनद्वारे पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST2020-04-15T05:00:00+5:302020-04-15T05:00:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यात एकूण ९६ ठिकाणी जीवनावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याची नोंद जिल्हा ...

Followed by drone in 96 of the crowded places | गर्दीच्या ९६ ठिकाणी ड्रोनद्वारे पाळत

गर्दीच्या ९६ ठिकाणी ड्रोनद्वारे पाळत

ठळक मुद्दे३४७ वाहने जप्त : नियम मोडणाऱ्यांकडून ११.४३ लाखांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात एकूण ९६ ठिकाणी जीवनावश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. याच ठिकाणी नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळल्या जात की नाही यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने पाळत ठेवली जात आहे. इतकेच नव्हे तर जो कुणी सोशल डिस्टन्सिंगकडे पाठ दाखवतोय त्याच्यावर कारवाइृ केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांकडे पाठ दाखविणाऱ्यांकडून आतापर्यंत ११ लाख ४३ हजार ६०१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे तर विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या ३४७ व्यक्तींची वाहने जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहा नगरपालिका तसेच चार नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एकूण ३४ क्रॉऊड झोन असल्याची नोंद घेण्यात आली आहे. याच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अबलंब व्हावा म्हणून वर्ग एक आणि वर्ग दोनच्या एकूण १० अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकांमध्ये एकूण ९० स्वयंसेवकांचा समावेश आहे. वर्धा जिल्ह्यातील ३६८ किराणा दुकानातून सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांची विक्री केली जात आहे. परंतु, काही व्यक्ती सोशल डिस्टन्सिंग तसेच जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे पाठ करीत असल्याचे लक्षात आल्याने एकूण १७४ व्यक्तींवर गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. तर ३४७ व्यक्तींची वाहने जप्त करण्यात आली आहे. तर सोमवार १३ एप्रिलपर्यंत ११ लाख ४३ हजार ६०१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. लॉकडाऊन मध्ये नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात ४८ झोपडपट्ट्या
वर्धा जिल्ह्यातील नागरी क्षेत्रात एकूण ४८ झोपडपट्ट्या असल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यात ३० इतक्या सर्वाधिक वर्धा उपविभागात असून आर्वी आणि हिंगणघाट या उपविभागात प्रत्येकी नऊ झोपडपट्ट्या असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणीही पोलिसांंची करडी नजर आहे.

Web Title: Followed by drone in 96 of the crowded places