शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

नेमेचि पोपटांचा थवा येई आमच्या घरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

घरचे निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांप्रती असलेला जिव्हाळा यामुळे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या घरी पोपटांची नित्यनेमाने शाळा भरत आहे. वर्षभर दिसेनासे होणारे हे पोपट जुलै महिन्यात क्षीरसागर यांच्या घरी येतात आणि ऑगस्ट महिना संपेपर्यंत मुक्कामी राहतात.

ठळक मुद्देदोन महिने असतो मुक्काम । क्षीरसागर परिवार करतोय सरबराई

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विकासाच्या झंझावातात शहरात सिमेंटची जंगले उभी राहिल्याने पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे पक्ष्यांचा किलबिलाट, पक्ष्यांची शाळा कालौघात नामषेश होताना दिसत आहे. अशाही परिस्थितीत वर्ध्यातील क्षीरसागर परिवाराचा पोपटांशी लळा लागला आणि जे घडले ते नवलच. त्यांच्या घरी दररोज एक-दोन नव्हे तर तब्बल दोनशे-तीनशे पोपट गोळा होतात. या पोपटांची येथे तास दोन तास शाळा भरते आणि सुरू होतो त्यांचा किलबिलाट. त्यांच्या या सुमधूर आवाजाने अख्खा परिसर प्रसन्न होऊन जातो. दररोज नागरिकही हा किलबिलाट ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात.प्रफुल्ल महादेवराव क्षीरसागर, असे या पक्षीप्रेमी गृहस्थाचे नाव आहे. त्यांचे कारला रोड परिसरातील सुदर्शननगरात घर आहे. घरात जवळपास ८०० चौरस फुटांमध्ये बगीचा तयार केला असून त्यात विविध फुलझाडांसह आंब्याचीही झाडे आहेत. घरचे निसर्गरम्य वातावरण आणि पक्ष्यांप्रती असलेला जिव्हाळा यामुळे मागील तीन वर्षांपासून त्यांच्या घरी पोपटांची नित्यनेमाने शाळा भरत आहे. वर्षभर दिसेनासे होणारे हे पोपट जुलै महिन्यात क्षीरसागर यांच्या घरी येतात आणि ऑगस्ट महिना संपेपर्यंत मुक्कामी राहतात. दररोज सकाळी पावणे सहा वाजतापासून पोपटांचे आगमन सुरु होते. हळूहळू दहा ते पंधरा मिनिटात दोनशे ते तीनशे पोपट त्यांच्या अंगणात अवतरतात. क्षीरसागर परिवारही या पोपटांसाठी अंगणात खाद्य व पाण्याची व्यवस्था करीत असल्याने दीड ते दोन तास त्यांचा किलबिलाट चालतो. क्षीरसागर यांच्या परिवारातील सर्व सदस्यांशी या पोपटांचा इतका लळा लागला की, सर्व पोपट त्यांच्या अवतीभवती, अंगणात, सुरक्षा भिंतीवर आणि गेटवर गर्दी करून बसतात. मग, पाऊस असो वा ऊन या पोपटांची हजेरी नियमित लागत असल्याने परिसरातील नागरिकांनाही आता पोपटांचे मनोहारी दृश्य आणि सुमधुर आवाजाने भुरळ घातली आहे.सकाळी सहा वाजताच पोपटांच्या घराभोवती घिरट्या सुरू होतात. त्यामुळे प्रफुल्ल क्षीरसागर यांच्यासह त्यांची पत्नी ज्योती, मुलगा हिमांशु व मुलगी रुपल हे सर्व सदस्य पोपटांच्या खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी धडपडतात. दररोज अंगणात तांदूळ व पाण्याची सोय केली जाते. तांदळाची व पाण्याची सोय केल्यानंतर क्षीरसागर परिवारातील सदस्य पोर्चमध्ये लावलेली बेल वाजतात. बेलचा आवाज ऐकून पोपटांची गर्दी होते. आजूबाजूला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चाहूल लागली की, सर्व उडून जातात. पुन्हा लगेच येऊन दाणे टिपतात.