शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

गावठी दारू नष्ट करण्याचा सपाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST

दारूमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नसल्याने जिल्ह्यातील पोलीस दररोज वॉश आऊट मोहीम राबविताना दिसत आहे. पण, याच काळात मोठ्याप्रमाणात गावठी दारूअड्डे उद्धवस्त केल्या जात असल्याने यापूर्वी हे दारूअड्डे पोलिसांना दिसले नाही का, अशी चर्चाही आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

ठळक मुद्देवॉशआऊट मोहीम : दारुभट्ट्या उद्ध्वस्त, लाखो लिटर दारुचा केला नाश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. दारूमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती नाकारता येत नसल्याने जिल्ह्यातील पोलीस दररोज वॉश आऊट मोहीम राबविताना दिसत आहे. पण, याच काळात मोठ्याप्रमाणात गावठी दारूअड्डे उद्धवस्त केल्या जात असल्याने यापूर्वी हे दारूअड्डे पोलिसांना दिसले नाही का, अशी चर्चाही आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.मागील काही दिवसांपासून स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांकडून गावठी दारू गाळणाऱ्यांविरूद्ध धडक मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील आनंदनगर, पुलफैल, पारधी बेडा परिसरात वॉश आऊट मोहीम राबवून लाखो लिटर दारूसाठा नष्ट करीत मुद्देमाल जप्त केला आहे. शहरालगतच्या परिसरातही दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढेही ही कारवाई पोलिसांकडून निरंतर सुरू राहावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सावळापूर, लहादेवी, हरदोली शिवारात छापा- आर्वी : नजीकच्या सावळापूर, लहादेवी, हरदोली जंगल शिवारात गावठी दारु गाळण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वॉश आऊट मोहीम राबवून तब्बल १२ लाख ५१ हजार रूपयांचा मोहा रसायन नष्ट करण्यात आला. राहुल मेश्राम, गौतम चंदनखेडे, नंदू मेश्राम, प्रकाश मेश्राम यांनी जंगल परिसरात कच्चा मोह रसायन सडवा ड्राममध्ये भरून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ठाणेदार संपत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढोले, अमित जुवारे, राजेश राठोड, अनिल राऊत, विलास कोकोडे, अतुल भोयर, अमोल अलवटकर, चंदू वाडवे, प्रदीप दातारकर, आदींनी सावळापूर, हरदोली, लहादेवी येथील जंगल शिवारात वॉश आऊट मोहीम राबविली असता लोखंडी ड्राममध्ये दारू सडवा मिळून आला. पोलिसांनी एकूण १५ लाख ५१ हजारांचा

दारूसाठा नष्ट करीत दारूविक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले.साती, वरूड पारधी बेड्यावर कारवाई- अल्लीपूर : अल्लीपूर आणि देवळी पोलीसांनी संयुक्तरित्या राबविलेल्या वॉश आऊट मोहिमेत वर्धा नदीपात्रालगत यवतमाळ लगतच्या पारधी बेड्यांवर कारवाई केली. यवतमाळ जिल्ह्यालगत असलेल्या साती पारधी बेडा, वरूड येथे वॉश आऊट मोहीम राबवून तब्बल ५० हजारांचा मोह रसायन नष्ट केले. ही कारवाई अल्लीपुरचे पोलीस निरीक्षक योगेश कामाले, देवळीचे ठाणेदार नितीन लेवरकर आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

रज्जकपूर येथील दारूअड्डा उद्ध्वस्त- सेवाग्राम : हमदापूर येथील नागरिकांनी रविवारी रज्जकपूर येथे सुरू असलेल्या दारूअड्ड्यावर छापा मारून दारूभट्टी उद्ध्वस्त केली. रज्जकपूर शिवारासह हमदापूर नजीकच्या परिसरातील काही गावात बेडे आहेत. तेथे सर्रास दारूची विक्री होते. याबाबत रज्जकपूर शिवारातील दिनेश पवार, विशाल पवार आणि विदूष भोसले यांच्या दारूअड्ड्यावर सरपंच श्रीकांत माजरे, पोलीस पाटील अतुल कांबळे, पंकज येळणे, दुगार्दास नक्षिण आदींनी छापा मारून दोन ड्राम मोह सडवा नष्ट केला. हमदापूर गाव दहेगांव ठाण्यांतर्गत येत असून यापूर्वी पोलिसांच्या मदतीने दारू गाळणाºयांना समज दिली.पढेगाव येथे दारूभट्ट्या उद्ध्वस्तचिकणी (जामणी) : परिसरात गावठी दारूची सर्रास विक्री सुरू असल्याने सरपंच अनंता हटवार यांच्यासह गावकºयांच्या पुढाकारने सावंगी पोलिसांनी कारवाई करीत दोन गावठी दारूभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. शनिवारी सावंगी पोलिसांनी पढेगाव, सेलसूरा रस्त्यालगतच्या नाला परिसरात आणि रविवारी पढेगाव चिकणी शिवारातील नाल्यालगत सुरू असलेल्या दोन गावठी दारूभट्ट्यांवर छापा मारून मोहा सडवा रसायन नष्ट केले. तसेच ड्राम जप्त केले. ही कारवाई सावंगी ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय बनसोडे, प्रकाश लोंढेकर, शैलेश कश्यप यांच्यासह गावातील मंगेश मुडे, गणेश तडस, प्रीतेश साटेणे, राजू तडस, संजय पेटकर, अर्जून अंतुरकर, प्रमोद रेवतकर, प्रवीण नाईक, दिनेश नारसे, गोलू नेहारे, मनोहर चक्रधरे यांनी केली आहे.

 

 

टॅग्स :Socialसामाजिक