शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुविधेसाठी राज्याला पाच पुरस्कार

By admin | Updated: August 23, 2014 02:01 IST

जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासोबतच बालमृत्यू, सिकलसेल, सुरक्षित मातृत्व तसेच रक्त अभिसरणासारख्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात

वर्धा : जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करण्यासोबतच बालमृत्यू, सिकलसेल, सुरक्षित मातृत्व तसेच रक्त अभिसरणासारख्या आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील पाच पुरस्कार राज्याला मिळाले आहेत. हा लौकीक यापुढेही कायम ठेवण्याकरिता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी केले. वर्धा येथे १०० खाटांचे स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्राची स्थापना आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांच्या हस्ते शुक्रवारी झाली. जिल्ह्यामध्ये १९१५ मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थापना झाली. या रुग्णालयात २८६ खाटा उपलब्ध आहेत. स्त्री रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शासनाने १०० खाटांच्या स्त्री रुग्णालयाच्या निर्मितीकरिता व उभारणीसाठी १४ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. तसेच येथे नवजात अर्भक केंद्राची स्थापनाही करण्यात येणार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तीन हजार ५५१ प्रसूती, ७५२ सिझेरीयन शस्त्रक्रिया, सात हजार सोनोग्राफी तसेच ६८८ स्त्री कुटुंब शस्त्रक्रिया मागीलवर्षी करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालयासोबतच स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्त्री रुग्णालय व नवजात अर्भक केंद्राची सुरुवात होत असल्यामुळे स्त्रियांना सुलभपणे आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ना. सुरेश शेट्टी यांनी स्त्री रुग्णालयाच्या बांधकामाचा शुभारंभ केला व त्यानंतर कोनशिलेचे अनावरण केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सोनोने यांनी स्त्री रुग्णालयाच्या बांधकामाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री रणजीत कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आ. सुरेश देशमुख, जि.प. अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, जि.प. उपाध्यक्ष संजय कामनापुरे, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, सभापती दिनेश धांदे, छोटू जगताप, कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)