शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल टँकरच्या कॅबिनला आग

By admin | Updated: June 11, 2014 00:13 IST

टँकर उभा करून चालक व वाहक चहा घेण्यासाठी गेले असता केबिन मध्ये अचानक बॅटरीजवळ शार्टशर्कीट होऊन केबिनने पेट घेतला. या आगीवर लवकर ताबा मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

समुद्रपूर : टँकर उभा करून चालक व वाहक चहा घेण्यासाठी गेले असता केबिन मध्ये अचानक बॅटरीजवळ शार्टशर्कीट होऊन केबिनने पेट घेतला. या आगीवर लवकर ताबा मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. ही घटना सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास जाम चौरस्त्यावर घडली. चंद्रपूर येथील बबलु ठाकूर यांच्या मालकीचा एमएच ३४-एबी २८५७ क्रमांकाचा टँकर भारत पेट्रोलियम बोरखेडी येथून तीन हजार लिटर पेट्रोल व नऊ हजार लीटर डिझेल घेवून गोंडपिपरीकडे निघाला होता. चालक शेख तौकीक व क्लीनर विलास डडमल हे जाम चौरस्त्यावर वाहतूक पोलीस मदत केंद्राजवळ टँकर उभा करून चहा घेण्याकरिता चहाटपरीवर गेले. त्यांना टँकरच्या केबिनमधून ज्वाळा दिसताच त्यांनी केबिनमधील छोट्या बंबाच्या सहायाने आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. टँकरने पेट घेतल्याने हा महामार्ग बंद करण्यात आला. टँकरमध्ये पेट्रोल होते. जर यावेळी पेट्रोलने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता. वाहतुक पोलिसांनी लागलीच हिंगणघाट नगरपालिकेची अग्निशमक दलाची गाडी पाचारण केली. अग्निशमन येताच १५ ते २० मिनिटात आग आटोक्यात आली. घटनेची माहिती मिळताच येथे पाच ठिकाणच्या अग्निशमन आल्या होत्या. घटनास्थळी आयपीएस राकेश ओला, समुद्रपूरचे ठाणेदार अनिल गिट्टावार, वाहतूक पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक बी.आर.ठाकूर व कर्मचारी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)