शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीतही निवडणुकीचा ज्वर

By admin | Updated: November 18, 2016 02:18 IST

सिंदी नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. स्थानिक नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष

न.प. सिंदी (रेल्वे) : आजी-माजी दिग्गजांनी कसली कंबरप्रशांत कलोडे  सिंदी (रेल्वे)सिंदी नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. स्थानिक नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता राजकीय पक्षासह अपक्ष असे ७ उमेदवार रिंगणात आहे तर १७ नगरसेवक पदाकरिता राजकीय व अपक्ष असे ८६ उमेदववार निवडणुकीच्या रिंगणात आहे. १ नगराध्यक्ष व १७ नगरसेवक निवडीसाठी उमेदवारामध्ये झुंज रंगणार असून प्रचाराच्या रणधुमाडीत कडाक्याच्या थंडीतही वातावरण तापलेले दिसत आहे.वाढत्या थंडीतही उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारांच्या भेटी घेण्यासाठी व मतदानाचा जोगवा मागण्यासाठी एकापाठोपाठ एक मतदारांच्या दारी जाताना दिसून येत आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांसह नुकताच प्रचाराचा नारळ फोडण्यात आला तर सिंदी-हिंगणघाट मतदार संघाचे आमदार समीर कुणावार यांच्या उपस्थितीत मिरवणुकीने भाजपा पक्षाने नुकताच प्रचाराचा नारळ फोडून पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा चंग बांधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याच्या नेत्याच्या गैरहजरीत स्थानिक नेत्यांसह प्रचाराचा नारळ फोडून बॅनर युद्ध व लाऊडस्पीकरच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. तसेच अपक्ष उमेदवारही आपल्या कार्यकर्त्यांसह निवडणुकीत कुठेही मागे दिसत नसल्याचे चित्र स्पष्ट जाणवत आहे.न.प. च्या निवडणुकीत यंदा १० हजार ४३४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून प्रभाग १ ते ७ मध्ये दोन उमेदवार तर प्रभाग ८ हा ३ उमेदवारांचा सर्वात मोठा प्रभाग आहे. नगराध्यक्ष पदाकरिता ७ उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराच्या प्रथम फेरीला सुरूवात झालेली असून काही उत्साही युवक वर्ग प्रचाराच्या रणधुमाळीत सामील होताना दिसत आहे. यात सट्टा बाजार सुद्धा सक्रीय असून कोणता उमेदवार निवडून येणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत आहे, तसतसा निवडणुकीला रंगत येत आहे. उमेदवारांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू आहे.