शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

‘गाव तेथे प्रवासी निवारा’ योजनेचा फज्जा

By admin | Updated: May 15, 2014 23:51 IST

शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात

पिंपळखुटा : शासनाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यात खासदार, आमदार निधीतून प्रवासी निवार्‍यांचे बांधका करण्यात आले. बांधकाम विभागाद्वारे बांधण्यात आलेले या निवार्‍यांची देखभाल, दुरूस्ती परिवहन महामंडळाद्वारे करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे सध्या गाव तेथे प्रवासी निवारा, या योजनेचा फज्जाच उडाल्याचे दिसते.

प्रवासी निवार्‍यांवर सध्या कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच प्रवासी निवार्‍यांवर गुरांनी ताबा मिळविला आहे. येथील निवार्‍यांत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना शासनाचा निधी बुडविणारीच ठरली.

राज्यात एसटी ही प्रवासाचे मुख्य साधन आहे. प्रवास करताना विविध बसस्थानकावर प्रवाशांना तासन्तास बसची प्रतीक्षा करीतत ताटकळावे लागते. अनेक ठिकाणी प्रवासी निवारे नसल्याने प्रवाशांना उन्ह, वारा, पावसाचा मारा सहन करीत बसची वाट पाहावी लागत होती. यामुळे गाव तेथे प्रवासी निवारा, ही संकल्पना उदयास आली. संपूर्ण जिल्ह्यात लोकप्रतिनिधींच्या निधीतून ग्रामीण भागात प्रवासी निवार्‍यांचे बांधकाम करण्याचा सपाटा सुरू झाला; पण बांधकाम केल्यानंतर या प्रवासी निवार्‍यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. या योजनेकरिता समाज सहभागही कमी पडला. यामुळे अनेक प्रवासी निवार्‍यांमध्ये स्वच्छतेच्या अभावाने सर्वत्र घाण पसरली आहे. अनेक निवार्‍यांना गुरांनी आपले आश्रयस्थान बनविले आहे.

प्रवासी निवार्‍यांमध्ये अस्वच्छता असल्याने निवार्‍यांबाहेर उभे राहून प्रवाशांना एसटीची प्रतीक्षा करावी लागते. शासनाने चांगल्या उद्देशाने गाव तेथे प्रवासी निवारा ही योजना राबविली; पण सध्या प्रशासन, प्रवाशांच्या उदासितेमुळे मूळ संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे. जिल्ह्यात अनेक प्रवासी निवारे बेवारस असून काही हॉटेल व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसते. उन्हात वा झाडांच्या आधार घेत बसची वाट पाहावी लागते. अडगळीत असलेल्या व जीर्ण झालेल्या प्रवासी निवार्‍यांचे नव्याने बांधकाम करणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. बांधकाम विभाग आणि परिवहन महामंडळाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)