शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होणारच; आदित्य ठाकरे यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 15:57 IST

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभी राहणार असून त्यासाठीच मी राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जनसंवाद यात्रेतून आपले आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचलो आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्या सर्वांना कर्जमुक्त केले जाईल असे आश्वासन युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिले. आर्वी येथील गांधी चौकात मंगळवारी रात्री त्यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.यावेळी मंचावर राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, सचिन अहिर, खा. राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अशोक शिंदे, वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, बाळा शहागडकर, माजी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख, माजी उपजिल्हाप्रमुख महेश चौधरी, महिला आघाडी प्रमुख सुधा शिंदे, अभिनंदन मुनोद, मुंबईचे राजू दिक्षीत आदी उपस्थित होते.यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाग मिळालेला नाही. त्या १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रूपये विमा प्रदान करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभी राहणार असून त्यासाठीच मी राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जनसंवाद यात्रेतून आपले आशिर्वाद घेण्यासाठी पोहोचलो आहे. प्रास्ताविक जिल्हा उपप्रमुख बाळा जगताप तर संचालन नितीन हटवार यांनी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे