शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांचा शेतमाल यार्डात शेतकऱ्यांचा रस्त्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 06:00 IST

व्यापाऱ्यांचा शेतमाल मार्केट यार्डात टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतमाल रस्त्यावर टाकावा लागला आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस येण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणलेला शेतमालही पाण्याने भिजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत असंतोष : वर्धा बाजार समितीचे व्यापारीधार्जिणे धोरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे धोरण नेहमीच व्यापारीधार्जिणे राहिले आहे. शेतकºयांच्या हिताची जपवणूक करण्याऐवजी नेहमीच व्यापारी हित जोपासणाऱ्या बाजार समितीने पुन्हा एकदा शेतकºयांना अडचणीत आणले आहे.व्यापाऱ्यांचा शेतमाल मार्केट यार्डात टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांना मात्र शेतमाल रस्त्यावर टाकावा लागला आहे. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. पाऊस येण्याची शक्यता असल्याने विक्रीसाठी आणलेला शेतमालही पाण्याने भिजण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.येथील बाजार समितीचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या खरेदी विक्रीतून बाजार समिती प्रशासनाला चांगले उत्पन्न मिळते. मिळणाऱ्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मात्र दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्यासह इतर सुविधा सुरळीत राहत नसल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करताना दिसतात. मागील आठवडाभरापासून शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने मार्केट यार्डात शेतमाल ठेवणे गरजेचे आहे. मात्र, यार्डात व्यापाऱ्यांच्या शेतमालाची पोती ठेवून आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपला शेतमाल रस्त्यावर इतरत्र टाकावा लागतो.अचानक पाऊस आल्यास शेतमाल भिजत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल टाकण्याकरिता शेड आहे. असे असताना यावर व्यापाऱ्यांनीच कब्जा केल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट असल्याचे या परिसरात फेरफटका मारल्यावर आढळून आले. याकडे बाजार समिती प्रशासनाचा कानाडोळा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.समितीतील ओट्याला शेडची प्रतीक्षाबाजार समितीत लगतच्या ग्रामीण भागातून शेतमाल आणला जातो. आवक वाढल्यानंतर यार्ड आणि खुली जागाही अपुरी पडते. याकरिता काही वर्षांपूर्वी भला मोठा ओटा तयार करण्यात आला. मात्र, त्यावर कित्येक वर्षांपासून शेड उभारण्यात आले नाही. ओट्यावर गवताचे पीक आले असून कचऱ्यांने विळखा घातल्याचे दिसून येते. स्वच्छतेकडे बाजार समिती प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड