शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची लगबग आता पेरणीपूर्व मशागतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 05:00 IST

जवळपास अडीच महिन्यांत पासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरुवात होणार, या आशेने पहाटे पाच वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरुवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. कापूस तूर, चणा घरी पडून आहे. शेतमालाला भाव नाही.

ठळक मुद्देउन्हाचा वाढतोय पारा : पहाटेच कामे उरकण्याला प्राधान्य

देऊरवाडा/आर्वी : कोविड-१९ या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अद्याप सुरूच आहे. पावसाळ्याला केवळ पंधरा दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे या लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता पेरणीचे ओढ लागली आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी राजाने शेतातील कामाला प्राधान्य देत पहाटे पाच वाजल्यापासूनच मशागतीच्या कामाला सुरुवात केल्याचे चित्र आहे.जवळपास अडीच महिन्यांत पासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ७ जूनला पावसाची सुरुवात होणार, या आशेने पहाटे पाच वाजताच शेतकरी शेतीकामांना सुरुवात करीत शेतातील काडीकचरा वेचण्याचे काम सुरू आहे. या लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले. कापूस तूर, चणा घरी पडून आहे. शेतमालाला भाव नाही. सीसीआयची खरेदी नाही. नाफेडची खरेदी संथगतीने सुरू आहे. परिणामी, मातीमोल भावात शेतमाल विकण्याशिवाय पर्याय नाही.निसर्गाचा लहरीपणा, वादळी पावसाने केलेले नुकसान अशा शेकडो बाबींनी बेजार असूनही शेतकरी मान्सूनपूर्व शेतीकामात व्यस्त आहे. पहाटे पाच ते सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत शेतात कामे करून घराकडे परततो आहे.बैलजोड्यांची अडचण भासत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने व्ही-पास, वखर, मोगरा आदींचा या मशागतीत समावेश आहे.घरच्याच बियाण्यांचा करतात वापरलॉकडाऊनमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. बी-बियाणे पेरणीसाठी पैसा आणायचा कोठून, या चिंतेत शेतकरी असून घरच्याच बियाण्यांना शेतकरी प्राधान्य देत आहे. इकडे कृषी दुकानदाराने बियाणे, खते मे महिन्यात आणली आहे. जून महिन्यातच शेतकऱ्यांची बियाणे खरेदीसाठी धावपळ होते. बहुतांश कृषी केंद्रचालकांनी नवीन बी-बियाणे आणले आहे.

 

टॅग्स :agricultureशेती