आकोली : म्हसाळा व जामणी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांत फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे़ ही तक्रार निखालस खोटी असल्याचे सांगून कृषी विभागाने आरोप फेटाळले आहेत़म्हसाळा येथील उत्तम नारायण पाटील यांनी २ क्विंटल ४० किलो, विलास डंभारे यांनी एक क्विंटल ५० किलो, संतोष श्रीनाथ यांनी १ क्विंटल ५० किलो व हिरामण वानखेडे या शेतकऱ्याने ६० किलो सोयाबीनचे खुले बियाणे कृषी सहायकाकडून खरेदी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गावात यापूर्वी सोयाबीन बियाणे खरेदी केलेल्या एका शेतकऱ्याच्या सांगण्यावरून उगवण क्षमता चांगली असल्याची हमी मिळल्यावर ६ हजार २०० रुपये प्रती क्विंटल या भावाने सोयाबीनच्या खुल्या बियाण्यांची खरेदी केल्याचे शेतकऱ्यांनी तक्रारीत म्हटले आहे. शेतकऱ्यांनी सदर बियाण्यांची पेरणी केली असता ते उगवलेच नाही, असे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे. पाटील या शेतकऱ्याने खरेदी केलेल्या खुल्या बियाण्यांच्या लगतच दुसऱ्या कंपनीचे बियाणे पेरले होते़ एकाचवेळी पेरणी झाली. असे असताना दुसऱ्या कंपनीचे बियाणे उगवले तर कृषी सहायकाकडून घेतलेले खुले बियाणे उगवलेच नाही़ यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले़ कृषी विभागाकडून प्रमाणित करण्यात आलेले बियाणेच उगवले नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ उगवण क्षमतेची तपासणी करून बियाणे खरेदी करण्याचा सल्ला कृषी विभागानेच दिला होता़ आता त्यांचेच बियाणे न उगवल्याने शेतकरी चकित झाले़ या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीतून केली आहे.(वार्ताहर)
सोयाबीन बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक
By admin | Updated: September 7, 2014 00:05 IST
म्हसाळा व जामणी येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्यांत फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे़ ही तक्रार निखालस खोटी असल्याचे सांगून कृषी विभागाने आरोप फेटाळले आहेत़
सोयाबीन बियाण्यात शेतकऱ्याची फसवणूक
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}