शहरं
Join us  
Trending Stories
1
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
2
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
3
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
4
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
5
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
6
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
7
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
8
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
9
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
10
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
11
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
12
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
13
Twisha Sharma : "हनिमूनलाच समर्थने माझ्या मुलीला..."; ट्विशाच्या वडिलांनी ढसाढसा रडत सांगितले जावयाचे कारनामे
14
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
15
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक आली समोर; जपानच्या तंत्रज्ञानाने सज्ज; काय आहेत वैशिष्ट्ये?
16
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
17
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
18
IND vs AFG Test: जसप्रीत बुमराह OUT; रणजी गाजवणाऱ्या Auqib Nabi Dar साठी उघडणार टीम इंडियाचा दरवाजा?
19
"मराठी वारशाची शान घेऊन...", कान्स रेड कार्पेट गाजवल्यानंतर अशोक सराफ यांची पोस्ट
20
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगणघाट कृउबा समिती संचालक मंडळाला मुदतवाढ

By admin | Updated: April 6, 2016 02:18 IST

दुष्काळाच्या कारणाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

सभापतींच्या याचिकेवर निर्णय : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश
हिंगणघाट : दुष्काळाच्या कारणाने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, संचालक मंडळाचा काळ संपत असल्याने अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी शासनाच्या आदेशाला न्यायालयात आव्हान दिले होते. यावर नवी निवडणूक होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दिला आहे.
समितीच्या संचालक मंडळाची मुदत ७ एप्रील पर्यंत होती. त्यापूर्वी निवडणुका होणे आवश्यक असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक घेण्यास विलंब झाला. त्यामुळे मंत्रालयाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या २३ मार्च २०१६ च्या अधिसूचनेनुसार ७ एप्रिलपासून पुढे सहा महिन्यांकरिता समितीच्या निवडणुकीला मुदतवाढ देण्यात आली. या आदेशात मुदतवाढ दुष्काळग्रस्त परिस्थितीने देण्यात आल्याचे नमुद करण्यात आले होते. या आदेशाविरोधात अ‍ॅड. सुधीर कोठारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात याचीका दाखल केली होती. त्यांनी तातडीने निवडणुका घेण्याची तसेच तोपर्यंत विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी लावून धरली.
१ सप्टेंबर २०१५ पासून संचालक मंडळाच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून जवळपास १५ स्मरणपत्रे दिल्याचे अ‍ॅड. कोठारी यांनी न्यायालयात सांगितले. तरीही वेळेवर निवडणुका लागल्या नाही. अशा स्थितीत संचालक मंडळाला निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती; परंतु शासनाने निवडणुकीला मुदतवाढ देवून संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याचा मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अ‍ॅड. कोठारी यांच्यावतीने अ‍ॅड. अंजन डे व बाजार समितीच्यावतीने अ‍ॅड. व्हीक्टन बस्टीन यांनी बाजू मांडताना निवडणूक घेण्यास संचालक मंडळ दोषी नसल्याने निवडणुकीपर्यंत त्या संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यात आल्याचे अनेक दाखले सादर केले. तसेच यापूर्वी धामनगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाला गतवर्षी मुदतवाढ मिळण्याची बाब न्यायालयासमोर मांडली. यावर शासनाच्यावतीने अ‍ॅड. भारती डांगरे यांनी बाजु मांडून संचालक मंडळाला मुदतवाढ देण्याची बाब मान्य केली. सदर याचीका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती वासंती नाईक व न्यायमूर्ती देशपांडे यांनी निकाली काढली.(तालुका प्रतिनिधी)