शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: October 5, 2016 01:48 IST

केंद्र शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व बेरोजगार युवकांपर्यंत पोहचविण्याकरिता अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा,

रामदास तडस : जिल्हा विकास समितीची सभावर्धा : केंद्र शासनाच्या लोकोपयोगी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व बेरोजगार युवकांपर्यंत पोहचविण्याकरिता अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, अशा सूचना समितीचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांनी दिल्या.जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण विकास विभाग, भारत सरकारच्या व नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार विकास भवन येथे या समितीची पहिली बैठक खासदार रामदास तडस यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.बैठकीला आमदार समीर कुणावार, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, प्रकल्प संचालक प्रमोद पवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय दैने, जि.प. चे उपाध्यक्ष विलास कांबळे, देवळी नगर परिषदेच्या अध्यक्ष शोभा तडस, सर्व नगर परिषदेचे अध्यक्ष समितीचे सदस्य माधव कोटस्थाने, दीपक फुलकरी, मनोनित सरपंच, सदस्य आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.पंतप्रधान ग्रामसडक योजना जिल्ह्यात येत्या काळात यशस्वी करण्याकरिता सर्व जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करण्याबाबत अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना देण्यात आली. त्याचप्रमाणे पांदण रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात करण्याकरिता आमदार समीर कुणावार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर खासदार रामदास तडस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य दखल घेण्याचे यावेळी सूचित केले.केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सुचनेनुसार बैठकीमध्ये महराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व शहरी, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, भूमी अभिलेख आधुनिकीकरण, दिन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना, श्याम प्रसाद मुखर्जी अर्बन मिशन, अमृत योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, एनआरएचएम कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बाल विकास योजना, शालेय पोषण आहार, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजीटल योजना याचा आढावा घेण्यात आला.(स्थानिक प्रतिनिधी)