शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रदानासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा

By admin | Updated: August 27, 2015 02:17 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने जिल्ह्यात नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले आहे.

निवृत्ती राठोड : नेत्रदान पंधरवडा जनजागृती रॅलीवर्धा : जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने जिल्ह्यात नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर २०१५ या कालावधीत करण्यात आले आहे. पंधरवड्यात जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी केले आहे.पंधरवड्याची सुरूवात जनजागृती रॅलीला हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी या पंधरवड्याचा उद्देश समजावून सांगताना डॉ. राठोड बोलत होते. रॅलीत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता भिसे, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. एस. बी. अंधारे, नेत्र विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. सुटे, नेत्र चिकित्सा अधिकारी व्ही. सी. रामटेके, ए. एस. वरघट, नेत्रदान समुपदेशक प्रफुल काकडे व जिल्हा सामान्य रूग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचीही उपस्थिती होती.डॉ. राठोड म्हणाले, जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये नेत्रदान पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्रदान पंधरवड्यात मरणोपरांत नेत्रदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. देशात १२ लाख व्यक्ती अंध आहेत. वेगवेगळ्या बुब्बुळाच्या आजाराने दरवर्षी २० हजार अंध व्यक्तींची यात भर पडत आहे. बुब्बुळाच्या आजाराने अंध असलेल्या व्यक्तींना नेत्रदानाद्वारे दृष्टीलाभ होऊ शकतो. किंबहुना बुब्बुळाच्या आजाराने अंध असलेल्या व्यक्तींसाठी बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच उपाय आहे. आजच्या परिस्थितीत देशात ४५ हजार ते ५० हजार नेत्रगोलके मरणोपरांत नेत्रदानातून प्राप्त होतात. हे प्रमाण अधिक वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी जनजागृती होण्याच्या दृष्टीने पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. रॅलीत शहरातील अनेकांचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)