शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिळ्या पोळ्या, अन्नही संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

आजही उघड्यावर मिळेल त्या जागी राहणारा हा पारधी समाज, विवाह सोहळा, तेरावी, चौदावी किंवा कोणताही समारंभ असो, तेथे, तेथील मंगल कार्यालयात किंवा जेथे हा कार्यक्रम असेल तेथे त्यांची मुलं बाया, जेवणानंतर पत्रावळीत टाकलेले उष्टे मागण्यासाठी कल्लोळ करतात. यावरच ते पोट भरतात. जे आपण फेकतो ते अन्न हा समाज आनंदाने स्वीकारतो आणि त्यावर आपली उपजीविका करतो.

ठळक मुद्देआता पोट कसे भरायचे? : पारधी समाजापुढे उभे ठाकले संकट

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : अनेक वर्षांपासून मिळेल ते उष्टे, शिळे अन्न खाऊन पोट भरणाऱ्या पारधी समाजावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्नसराई ठप्प असल्याने उपासमारीचे संकट ओढवले असल्याचे चित्र आहे.एप्रिल, मे आणि जून हे तीन महिन्यांत दरवर्षी लग्नसराईची धामधूम असते. यंदा मात्र, विवाह सोहळे ठप्प आणि झालेच तर आटोपशीर. यामुळे या व्यवसायावर निर्भर सर्वच संकटांच्या गर्तेत सापडले. अन्नासाठी भटकंती करणाऱ्या पारधी समाजबांधवांचीही तीच अवस्था झाली. आजही उघड्यावर मिळेल त्या जागी राहणारा हा पारधी समाज, विवाह सोहळा, तेरावी, चौदावी किंवा कोणताही समारंभ असो, तेथे, तेथील मंगल कार्यालयात किंवा जेथे हा कार्यक्रम असेल तेथे त्यांची मुलं बाया, जेवणानंतर पत्रावळीत टाकलेले उष्टे मागण्यासाठी कल्लोळ करतात. यावरच ते पोट भरतात. जे आपण फेकतो ते अन्न हा समाज आनंदाने स्वीकारतो आणि त्यावर आपली उपजीविका करतो. पोळ्यांचे तुकडे वाळवत अनेक दिवस खाऊन गुजराण करतात. आजही या मुलांच्या अंगावर धड कपडे नाही, जुने कोणीतरी दिलेले कपडे ते वापरतात. राहण्यास हक्काची जागाच नाही.येथील कन्या शाळेसमोर मोकळ्या मैदानावर रात्रंदिवस ऊन, पाऊस असो थंडी असो, निसर्गाशी एकरूप होत हे लोक राहतात. या समाजाकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहिले जात नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.पारध व्यवसायावरून या जातीला पारधी हे नामाभिधान प्राप्त झाले आहे. शिकारीव्यतिरिक्त दगडी साहित्य बनविणे, औषधी वनस्पती विकणे, मोलमजुरी करणे हे त्यांचे मुख्य व्यवसाय होते. पारधी वाघरी बोलीभाषा बोलतात. पण आता त्यांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांच्यापुढे उदरनिवार्हाचा प्रश्न उभा ठाकला आहे. आता कोविड-१९ च्या विषाणूच्या प्रादुभार्वाने सर्वत्र लॉकडाऊन आहे त्यामुळे विवाह सोहळ्यांसह विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यावर काही महिने उपजीविका असणाºया या पारधी समाजाचीही विदारक अवस्था आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या