शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मूल्यांकन; उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती

By admin | Updated: February 12, 2015 01:31 IST

स्थानिक नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनाचे खाजगी कंपनीला दिलेले काम नियमबाह्य असल्याने २०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षाकरिता ...

हिंगणघाट : स्थानिक नगरपालिकेने चतुर्थ वार्षिक कर मूल्यांकनाचे खाजगी कंपनीला दिलेले काम नियमबाह्य असल्याने २०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षाकरिता केलेली करआकारणी रद्द करण्यात यावी, तसेच नव्याने चार महिन्यांच्या आत नागरिकांच्या मालमत्तेचे कर मूल्यांकन करण्याचा आदेश १२ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. जा आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिल्याने हिंगणघाट नगर पालिकेचा कर वसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंगणघाट नगरपालिकेने १४ जुलै २००९ च्या सर्वसाधारण सभेत २०११-१२ ते २०१४-१५ या चार वर्षाच्या कालावधीचे जनतेच्या मालमत्तेचे करमूल्यांकन खाजगी कंपनीकडून करण्याचा निर्णय सर्वानुमते पारित करण्यात आला. त्याची अमलबजावणी करण्यात आली. याविरूद्ध येथील आर. एस. आर. मोहता मिल गिमाटेक्स, संदीप इंदरचंद गांधी व आरती प्रदीप हरणे यांनी संयुक्तरीत्या उच्च न्यायालयात यचिका दाखल करून कर आकारणीबाबत फेरविचार करण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाचा बाजू ऐकून न.प.ने खासगी कंपनीला दिलेले करमूल्यांकनाचे काम नियमबाह्य असल्याचे सांगून करवसुली स्थगित करण्याचे आदेश नगर पालिकेला दिले. तसेच चार महिण्याचे आत पुनर्मूल्यांकन करण्याचे निर्देशही दिले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला न.प. ने सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आव्हान देऊन याचिका दाखल केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू समजावून घेऊन उच्च न्यायालय, नागपूरने दिलेल्या आदेशाला ६ फेब्रुवारी २०१५ रोजी पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. त्यामुळे न.प.च्या करवसुलीचा मार्ग मोकळा झाला. नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाला करवसुली देवून सहकार्य करावे व जप्तीची कार्यवाही टाळावी, असे आवाहन मुख्याधिकारी सुनील जगताप यांनी केले. न.प.च्या वतीने अ‍ॅड. एस. बी. देशमुख, अ‍ॅड. देशमुख, अ‍ॅड. सुब्रमन्यम यांनी तर दुसऱ्या पक्षाकडून अ‍ॅड. भागडे, अ‍ॅड. राहुल भागडे, अ‍ॅड. जैस्वाल व अ‍ॅड. शेखर यांनी काम पाहिले.(तालुका प्रतिनिधी)