शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल चौकातील अतिक्रमण हटणार

By admin | Updated: March 30, 2017 00:38 IST

येथील मेडिकल चौकात अतिक्रमणधारक दुकानदारांना जागा खाली करून देण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागने दिले आहे.

सेवाग्राम : येथील मेडिकल चौकात अतिक्रमणधारक दुकानदारांना जागा खाली करून देण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागने दिले आहे. अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात येत असून त्यापूर्वी दुकानदारांनी सूचनेचे पालन करीत येथील दुकाने उचलायला सुरूवात केली. बुधवारी सकाळपासून चौकात लगबग पाहायला मिळाली. यावरुन येथील अतिक्रमण हटणार असल्याचे दिसते. वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर या राज्य मार्गावर अतिक्रमण वाढत आहे. रहदारीच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग आहे. सेवाग्राम मेडिकल चौकातून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लावण्यात आली. या मार्गाचे काही प्रमाणात सौंदर्यीकरण करण्यात आले. रस्त्यालगत टपऱ्या लावून अनेकांनी उदरनिर्वाहाचे साधन निवडले. सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी वर्धा-सेवाग्राम-समुद्रपूर रस्त्यावर सेवाग्राम हद्दीत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून दुकानधारकांना नोटीस दिल्या. हे अतिक्रमण २९ मार्चपर्यंत खाली करायचे होते. बांधकाम विभागाकडून होणाऱ्या कारवाईत सामान ताब्यात घेऊन कारवाईचा खर्च दुकानदारांकडून वसूल करण्यात येणार होता. त्यामुळे येथील दुकानदारांनी ही जागा खाली करण्याचा सपाटा लावला आहे. वर्धा-समुद्रपूर, वर्धा-कांढळी आणि सेवाग्राम पवनार या मार्गाचे रूंदीकरण होणार असल्याची चर्चा आहे. सेवाग्राम हे पर्यटन केंद्र असल्याने सौंदर्यीकरणावर भर देण्यात येणार असल्याने अतिक्रमण हटविण्यात येत आहे.(वार्ताहर)