शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात प्रभावी अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ३६३ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८८० व्यक्तांची १४ दिवसाचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला असून अद्याप २ हजार ४८३ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य विभागाकडून सुुरुवातीपासून ६७ जणांचे रक्त व स्त्राव नमुने तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्देपाठविलेले ६७ थ्रोट स्वॅब निगेटिव्ह : दुपारनंतर रस्ते होतात निर्मनुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत कोरोना विषाणू पाय पसरत असतानाच वर्ध्यात जिल्हा प्रशासनाकडून होत असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे त्याला रोखण्यात सध्यातरी यश आले आहे. आज लॉकडाऊनचा अठरावा दिवस असून आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ६७ स्त्राव नमुने चाचणीकरिता पाठविण्यात आले होते. ते सर्वच नमुने आज गिनेटिव्ह आले आल्याने वर्ध्यात एकही रुग्ण अद्याप आढळून आला नाही. त्यामुळे वर्धेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, संकट कायम असल्याने खबरदारी घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ३६३ व्यक्ती बाहेर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांच्या तपासणी करुन त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी १२ हजार ८८० व्यक्तांची १४ दिवसाचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला असून अद्याप २ हजार ४८३ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. आरोग्य विभागाकडून सुुरुवातीपासून ६७ जणांचे रक्त व स्त्राव नमुने तपासणीकरिता प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. आजपर्यंत सर्वच नमुन्यांना अहवाल प्राप्त झाला असून सर्वच निगेटिव्ह आले आहे. सध्यस्थितीत जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी राज्यातील परिस्थिती लक्षात घेत जिल्हा प्रशासनाकडून कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. रस्त्यावर फिरु नका, घरातच सुरक्षीत रहा, अशा आवाहनानंतरही नागरिक रस्त्यावर येत असल्याने आजपासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. पहिल्याच दिवशी वर्धा विभागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या २९, मास्क न लावणाºया ५३ तर विनाकारण डबल सीट फिरणाऱ्यांना १४ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.फिरणाºयांसह मास्क न वापरणाºयांना दंडसिंदी (रेल्वे): संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीने फिरणारे व सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता वावरणाºयांवर सिंदी (रेल्वे) येथील मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी कारवाईचा बडगा उगारत दंड ठोठावला. पहिल्याच दिवशी त्यांनी ५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. वर्ध्याचे उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी काढलेल्या आदेशानुसार मुख्याधिकाºयांनी कारवाईला सुुरुवात केली आहे. विनाकार दुचाकीने डबल सीट फिरणाºया ८ जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे ४ हजार रुपये तर मास्क न वापरता फिरणाºया सहा जणांकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे १ हजार २०० असा एकूण ५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. शहरातील बाजार चौक व कांढळी मार्गावर ही कारवाई केली असून आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे घरीच रहा, सुरक्षीत रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास झंवर यांनी केले आहे. या ठिकाणी शासनाच्या निर्देशाचे पालन होते की नाही, याची पाहणी करण्याकरिता उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी शहरातीला भेट दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या