शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारमुळे पडिक शेती होणार हिरवी

By admin | Updated: March 28, 2017 01:08 IST

उमरगाव येथील शेतकऱ्यांची बहुतांश शेती पंचधारा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेतातून पाणी वाहून जात शेतकऱ्यांच्या पिकांची धुळधान होत होती.

पुराचा धोका टळणार : उमरगाव येथील शेतकऱ्यांना दिलासाझडशी : उमरगाव येथील शेतकऱ्यांची बहुतांश शेती पंचधारा नदीच्या काठावर आहे. पावसाळ्यात नदीला पूर येऊन शेतातून पाणी वाहून जात शेतकऱ्यांच्या पिकांची धुळधान होत होती. परिणामी, शेतकरी शेती पडिक ठेवत होते. जलयुक्त शिवार अभियानात या नदीचे खोलीकरण तथा बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. यामुळे ही शेती वहिवाटीखाली येणार आहे.उमरगाव परिसरातील पंचधारा नदी काठावरील बहुतांश शेतकऱ्यांचे शेती पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे पडिक राहत होती. याबाबत संबंधित विभागाकडे लेखी अर्ज दिले. तक्रारी करण्यात आल्या; पण कारवाई झाली नाही. यामुळे दोन वर्षांपासून शेती पडिक होती. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. कुणाल जयस्वाल यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत सर्व शेतकऱ्याचे एकत्रित अर्ज जि.प. लघुसिंचन विभाग यांना सादर केले. पंचधारा नदीवर साठवण बंधाऱ्याची मागणी केली. गतवर्षी शिवारफेरीमध्ये सरपंच यांनीही जलयुक्त शिवार योजनेतून कामांची शिफारस केली. यावरून नदीच्या रूंदीकरणासह खोलीकरण करण्यात आले. शिवाय बांधबंधिस्ती केली. यामुळे पावसाळ्यातील पुराचा धोका टळला आहे. यंदा शेतकऱ्यांना शेतीची वहिवाट करता येणार आहे. यातील २०० ते ३०० मिटरचे काम अर्धवट राहिले असून ते काम पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.(वार्ताहर)