शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या दुष्काळाचे सावट टळले

By admin | Updated: September 14, 2014 00:08 IST

जिल्ह्यात सर्वत्र आठवडाभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात घोंगावत असलेल्या कोरड्या दुष्काळाने सावट टळले आहे. सर्वत्र शिवारांमध्ये पराटी सोयाबीन लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील

वर्धा : जिल्ह्यात सर्वत्र आठवडाभरापूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यात घोंगावत असलेल्या कोरड्या दुष्काळाने सावट टळले आहे. सर्वत्र शिवारांमध्ये पराटी सोयाबीन लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे. पण असे असतानाही काही शिवारांमध्ये मररोगही पिकांवर दिसून येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात बदल झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाला. अनेक पिके अळ्यांनी फस्त केली होती. तसेच पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता होती. परंतु पाऊस यायला तयार नव्हता. त्यामुळे यंदा कोरड्या दुष्काळाला सामोरे जावे लागेल असे चित्र निर्माण झाले होते. पण गणरायाच्या निरोपाला वरुणराजाची दमदार हजेरी लागल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली. पावसाआभावी शेवटच्या घटका मोजत पिवळी पडत चाललेली कोरडवाहू पराटी शेवटच्या घटका मोजत होती. परंतु पावसाने वेळेवर चांगली हजेरी लावल्याने पराटी जगली. तसेच खरीप हंगामातील पिकांवर आलेल्या रोगराईचे संकट संततधार पावसाने धुवून काढले असले तरी काही ठिकाणी मररोगाचे सावट पहावयास मिळत आहे. पाऊस येत नसल्याचे अनेक लोकांना नक्षत्राची जाणीवच संपली होती. सर्वत्रच उष्णतेचे वातावरण पसरले होत. उष्णतेची झळ ग्रामीण भागासोबतच नागरिकांनाही बसत होती. पावसाळ्यातही उन्हाचा त्रास होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. पाणी नसल्याने कपाशी तसेच इतर पिके कोमेजली होती सोयाबीन पिकांनाही थोड्याफार पावसाची गरज होती. तूर,मिरची व इतर पिकांनाही पाणी येत नसल्याने फटका बसत होता. परंतु अनंत चतुर्दशीच्या दिवसापासून संततधार पावसाने गणेशाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यात आगमन केले. त्यामुळे कोमेजलेली खरीप हंगामातील पिके ताजीतवानी दिसू लागली.पिवळे पडलेले शेतशिवार आता हिरवेगार दिसू लागले आहे. संततधार पावसाने खरीप हंगामातील सर्वच पिकाला जीवदान दिले. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आता पावसाने अशीच साथ द्यावी आणि उत्पन्न चांगले व्हावे अशी अशा शेतकरी व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)