शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीकरिता आलेला दारूसाठा जप्त

By admin | Updated: November 19, 2016 01:05 IST

जिल्ह्यात निवडणुकीचा ज्वर चढत आहे. निवडणुकीच्या काळात दारूचा वापर करून मतदान वळविण्याच्या

५.६६ लाखांचा मुद्देमाल : पाच जणांविरुद्ध गुन्हा वर्धा : जिल्ह्यात निवडणुकीचा ज्वर चढत आहे. निवडणुकीच्या काळात दारूचा वापर करून मतदान वळविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांकडून आतापासून दारूचा साठा गोळा करण्याचे काम सुरू आहे. याच कामाकरिता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून दारूसाठ्यासह एकूण ५ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोन्ही कारवाईदरम्यान पाच जणांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सुत्रांनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील वणीमार्गे हिंगणघाट येथे दारू येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून गुरुवारी मध्यरात्री वणी फाट्यावर नाकेबंदी करून एम. एच. ३३ ए. ३४० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता वाहनात दारूसाठा दिसला. या कारवाईत पोलिसांनी दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार व ९१ हजार २०० रुपयांचा दारूसाठा असा २ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी पोलिसांनी शंकर शिवलाल जयस्वाल, साईनाथ तुलाराम कटारे व अजय शालिक नंदुरकर तिन्ही रा. वडनेर यांच्याविरुद्ध दारूबंदी कलमान्वये हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट पोलीस ठाण्याचे कर्मचारी हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिसन ईप्पर आदींनी केली.दुसरी कारवाई समुद्रपूर पोलिसांनी शेडगाव (कुंड) शिवारात केली. पोलिसांनी नागपूरकडुन हिंगणघाटकडे जाणारी एम. एच. १४ ए. टी. ९९९० क्रमांकाची कार नाकेबंदी करीत अडविली. वाहनाची पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी वाहनातील दारूसाठा, दारूची वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार व इतर साहित्य असा एकूण ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दरम्यान नितेश अशोक पडक्के व अमीत भीमराव झोड यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी केली.(शहर प्रतिनिधी)