शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रपूर तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देसोयाबीन अन् कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन व कपाशीची लागवड केली. त्यानंतर तब्बल २२ दिवसांचा पावसाचा खंड पडला. परिणामी अंकुरलेली विविध पीक करपण्याच्या मार्गावर होती. अशातच मागील दोन आठवड्यापासून थांबून थांबून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सध्या पीक पिवळी पडत असून संपूर्ण तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे.सततच्या पावसाने शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांना सळो की पळोच करून सोडल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. २९ जुलैपासून तालुक्यात थांबून थांबून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचत असून काही शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात शेत शिवारांमध्ये पाणी साचून असल्याने सध्या पीक पिवळी पडत आहेत. शेतातील पाण्यामुळे कपाशीचे पान गळत आहेत.यामुळे यंदाही नापिकीला तोंड द्यावे लागले, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. तालुक्यातील कपाशी व सोयाबीन पीक सध्या आॅक्सीजनवर असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी बोनस अशी ओळख असलेले सोयाबीनचे पीक दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांना दगा देणार, असेही वृद्ध शेतकरी सांगतात. सततच्या पावसामुळे तालुक्यावर सध्या ओल्या दुष्काळाचे सावट आहे. अनेक शेतकºयांना पावसामुळे मशागतीची कामे करता आली नाही. अशातच ढगाळ वातावरण असल्याने त्याचा परिणामही उभ्या पिकांवर होत आहे. इतकेच नव्हे तर पिकांची वाढही खुंटल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. संपूर्ण तालुक्याच्या शेत पिकांची परिस्थिती पाहता समुद्रपूर तालुक्याला ओल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत टाकावे तसेच तालुक्यातील शेतकºयांना भरीव शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.कष्टकऱ्याचा रोजगार हिरावलाशेतमजुरीची कामे करून कुटुंबाचा गाढा ओढणाऱ्यांची संख्या तालुक्यात मोठी आहे. परंतु, पावसाने त्यांच्याही अडचणीत भर टाकली आहे. सततच्या मुसळधार पावसाने त्यांचा रोजगारच सध्या हिराव्याचे दिसून येत आहे. सदर कष्टकऱ्यांवर उपासमारीचीच वेळ आली आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने त्यांच्या हाताला काम देण्याची गरज आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती