श्वान, बॉम्ब शोध पथकात पाच श्वान देताहेत सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:00:29+5:30

प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सांभाळत असले तरी पोलीस श्वान पथकातील रॉकी, बादल जॉनी तर बॉम्ब शोधक पथकातील डॉन आणि रेम्बो हे श्वान पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाचीच भूमिका बजावत आहेत.

Dogs, five dogs serving in the bomb search squad | श्वान, बॉम्ब शोध पथकात पाच श्वान देताहेत सेवा

श्वान, बॉम्ब शोध पथकात पाच श्वान देताहेत सेवा

Next
ठळक मुद्देरॉकी, बादल, जॉनी तर डॉन, रेम्बो घालतोय भुरळ

महेश सायखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी सांभाळत असले तरी पोलीस श्वान पथकातील रॉकी, बादल जॉनी तर बॉम्ब शोधक पथकातील डॉन आणि रेम्बो हे श्वान पोलीस अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महत्त्वाचीच भूमिका बजावत आहेत. अनेक प्रकरणात हे पाचही श्वान अधिकाऱ्यांसाठी मदतगार ठरले असून त्यांची काम करण्याची पद्धत अनेकदा सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना भूरळच घातले.
पोलीस श्वान पथकातील रॉकी व बादल हे दोघे डॉबरमॅन प्रजातीचे श्वान असून ते चोरट्यांचा मागोवा घेण्यासह गुन्ह्यांचा शोध घेण्यात तरबेज आहेत. तर जॉनी हा स्फोटक शोधण्यात तरबेज आहे. १२ मार्च २०१६ ला जन्मलेल्या रॉकी तर १८ नोव्हेंबर २०१६ ला जन्मलेल्या बादलचे प्रशिक्षण पूणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात पूर्ण झाले. रॉकीने ८ आॅगस्ट २०१६ ते ८ मे २०१७ या कालावधीत तर बादल याने २१ जुलै २०१७ ते २७ एप्रिल २०१८ या कालावधीत सैनिकासारखेच प्रशिक्षण घेतले. तर १२ डिसेंबर २०१७ ला जन्मलेल्या जॉनीने ५ जुलै २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत चंदीगढ येथे स्फोटकांचा शोध घेण्याचे प्रशिक्षण घेतले. रॉकी आणि बादल वर्षाला सुमारे ७५ कॉल अटेंड करतात तर जॉनी वर्षाला सुमारे २५ कॉल अटेंड करीत असल्याचे सांगण्यात आले. शिवाय बॉम्ब शोधक व नाशक पथकात सध्या डॉन आणि रेम्बो सेवा देत आहेत. हे दोन्ही श्वान लॅब्राड्रार प्रजातीचे आहेत. तीन वर्षांचा डॉन तर दोन वर्ष वयोगटाचा रेम्बो अतिशय उत्कृष्टपणे स्फोटक शोधून काढण्यात तरबेज आहेत.
पोलीस श्वान पथकाची दूरा सध्या पोलीस उपनिरीक्षक संजय नेरकर तर बॉम्ब शोधक व नाशक पथकाची दूरा सध्या पोलीस उपनिरीक्षक राजेश्री रामटेके सांभाळत आहेत. रॉकी, बादल, जॉनी तर डॉन आणि रेम्बो हे पाचही श्वान त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी नेहमीच उत्कृष्टपणे पार पाडत असल्याचे सांगण्यात आले.

‘शिवा’ अन् ‘राणा’ जीव की प्राण
पोलीस श्वान पथकात यापूर्वी शिवा आणि राणा हे दोघे श्वान होते. १८ ऑगस्ट २००६ ला जन्मलेल्या या दोन्ही भावंडांनी पोलीस श्वान पथकात दीर्घ कालीन सेवा दिली. शिवा स्फोटक शोधण्यात तर राणा गुन्ह्यांचा शोध घेण्यात तरबेज होता. शिवा हा श्वान ३१ ऑगस्ट २०१६ ला तर राणा हा श्वान ३ डिसेंबर २०१५ ला सेवानिवृत्त झाला. शिवा अन् राणा हे दोघे भावंड एखाद्या प्रकरणात अचूक निकषावर पोहून त्यांची माहिती विशिष्ट पद्धतीने त्यांच्या हॅन्डलरला देत असे. त्यामुळे ते सदर पथकातील अनेकांचे जीव की प्राणच होते. शिवा अन् राणा यांचा सेवानिवृत्तनंतर मृत्यू झाला. त्यानंतर या पथकात रॉकी, बादल व जॉनी या श्वानांची सेवा देण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय ते सध्या उत्कृष्ट पद्धतीने सेवा देत आहेत.

बॉम्बशोधक व नाशक पथकात पूर्वीही होता ‘डॉन’
बॉम्ब शोधक व नाशक पथकात सध्या तीन वर्षीय डॉन तर दोन वर्षीय रेम्बो सेवा देत आहेत. असे असले तरी त्यांच्यापूर्वी याच पथकात डॉन व डिव्ह ही दोन श्वान होती. त्यांनी सुमारे दहा वर्ष सेवा दिली. त्यानंतर त्यांना सेवानिवृत्त करण्यात आले. सेवानिवृत्त झाल्यानंतर अवघे काहीच महिने त्यांनी बाहेरच्या जगात श्वास घेतला. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. डॉन आणि डिव्ह यांच्या मृत्यूनंतर त्यांची जागा डॉन व रेम्बो यांनी घेतली असल्याचे सांगण्यात आहे.

श्वान पथकाला २००८ मध्य पहिला अधिकारी
पोलीस श्वान पथकाला प्रथम पोलीस अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नवरत्तम पुरी हे लाभले. ९ जानेवारी २००८ ला त्यांच्याकडे सदर पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर जोशी यांना जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सतीश लाड यांच्याकडे या पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली. तर सध्या पोलीस उपनिरीक्षक संजय नेरकर हे पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात पोलीस श्वान पथकाची जबाबदारी सांभाळत आहेत.

 

Web Title: Dogs, five dogs serving in the bomb search squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस